उत्तर प्रदेशातील अभिजीत बिचुकले; ७५ वय, ९३ निवडणुका, ० विजय

UP election 2022 : आग्रा येथील रहिवासी असलेले Hansuram Aambedkari असे त्यांचे नाव आहे.
Hansuram aambedkari
Hansuram aambedkari Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : महाराष्ट्रातील साताऱ्यात अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) नावाचा एक चेहरा बराच परिचीत आहे. निवडणुका लढणे आणि त्यात पराभूत होणे यासाठी हा चेहरा बराच गाजतो. अगदी विधानसभा निवडणुकांपासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत अनेक निवडणुका त्यांनी लढल्या आणि हरल्या. आता उत्तर प्रदेशमध्ये देखील एक असेच अभिजीत बिचुकले आढळून आले आहेत. ज्यांचे वय सध्या ७५ आहे आणि त्यांनी आतापर्यंत ९३ निवडणुका लढल्या असून अद्याप त्यांना एकाही निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही.

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील रहिवासी असलेले हसनूराम आंबेडकरी (Hansuram Aambedkari) असे त्यांचे नाव आहे. या आंबेडकरी यांना १०० वेळा हरण्याचा रेकॉर्ड बनवायचा आहे. त्यासाठी ते आता उत्तर प्रदेश विभानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) ९४ व्या वेळा उभे राहिले आहेत. हा आगळा-वेगळा रेकॉर्ड करण्यामागे देखील एक खास कारण आहे. महसूल विभागातील नोकरी करत असताना १९८५ साली त्यांना एका पक्षाने तिकीट देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी ही नोकरी सोडली. मात्र त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यावर त्यांनी पक्षाला कारण विचारले, त्यावर एका पदाधिकाऱ्याने त्यांना उत्तर दिले की, तुझ्या शेजारचेही तुला नीट ओळखत नाहीत, तर बाकीचे लोक काय तुला मतदान करणार? नेमकी हिच होष्ट हसनूराम खटकली.

Hansuram aambedkari
महाराष्ट्रातील बड्या साखर व्यापाऱ्यावर 'आयकर'ची धाड; मोठं घबाड हाती

यानंतर हनसूराम (Hansuram Aambedkari) यांनी फतेहपुर सिकरी विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election) मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला आणि १७ हजार ७११ मत मिळवत थेट तिसरे स्थान मिळवले. तिथपासून ते सातत्याने लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी बँक अशा निवडणुक लढवत आहेत. इतकचं नाही तर त्यांनी देशाच्या राष्ट्रपती पदाची देखील निवडणूक लढवली आहे. त्यांनी आग्रा ग्रामीणमधून १२ वेळा, खैरागडमधून १२ वेळा आणि फतेहपुर सिकरीमधून ६ वेळा निवडणूक लढवली आहे.

Hansuram aambedkari
सीबीआयच्या छाप्यांनी पुन्हा खळबळ; केंद्राच्या गॅस अॅथॉरिटीचे संचालक अटकेत

हनसूराम हे पेशाने शेतकरी आणि रोजगार हमीचे कामगार आहेत. त्यांच्या घरी पत्नी शिव देवी आणि ५ मुले-मुली आहेत. या निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र फंड बनवला आहे. ते रोज या फंडात काही पैसे टाकतात. ते सांगतात त्यांना अर्ज भरण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढाच त्यांना खर्च येतो. याव्यतिरीक्त त्यांना निवडणूक प्रचारात एक रुपाया देखील खर्च येत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, प्रचारासाठी ते थेट लोकांच्या जातात. जे लोक कोणत्याही पक्षाला, नेत्याला न मानणारे आहेत ते त्यांना मत देतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com