Akhilesh Yadav News: उत्तर प्रदेश इंडिया आघाडीचेच; अखिलेश यादवांनी आकडाच सांगितला

Akhilesh Yadav On UP Lok Sabha Election: प्रयागराजमधील सभास्थळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशासाठी काय काय कामं केली, याची माहिती दिली.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

UP Lok Sabha Election 2024: समाजवादी पक्षाचे नेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारासाठी सपा आणि काँग्रेसने चांगलाच जोर लावल्याचं दिसत आहे. शिवाय सपा नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या जोडीला येथील युवकांची पसंती मिळत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

अशातच आज प्रयागराजमध्ये (Prayagraj) आयोजित केलेल्या या नेत्यांच्या सभेला युवकांनी मोठ्या प्रमाणात हजरी लावली होती. शिवाय या सभेला इतकी गर्दी झाली होती की, तिथे जमलेल्या गर्दीवर पोलिसांनादेखील नियंत्रण ठेवता आलं नाही. या गर्दीमुळे सभास्थळी चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये अनेक युवक जखमी झाले. पोलिसांची हतबलता आणि युवकांचा जोष पाहून अखेर गर्दी नियंत्रित करण्यासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे सरसावले. तरीदेखील गर्दी शांत झाली नाही. शेवटी दोघांनी व्यासपीठावर बसून, आमची सत्ता आल्यास काय कामं करणार याची माहिती जमलेल्या नागरिकांना दिली. या सभेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशासाठी काय काय कामं केली, याची माहिती दिली. ते म्हणाले, "मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) पैलवान आहेत. त्यांची नाळ या मातीबरोबर जोडलेली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांवर त्यांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे यावेळी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमधून 79 जागा मिळतील" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अग्निवीर योजना कचऱ्याच्या डब्यात फेकणार

तर सभेच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीसमोर बोलताना राहुल गांधींनी युवकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, सरकार येताच कोणत्याही परिस्थितीत अग्निवीर योजना (Agniveer Yojana) बंद करणार. तसेच लष्करात पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ युवकांची भरती करणार. शिवाय जुनी पेन्शन योजना सुरु करणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. तर अग्निवीर ही योजना बकवास आहे, ती कचऱ्याच्या डब्यात फेकून देणार, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, मनरेगा योजनेतील मजुरीत वाढ करणार, असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Akhilesh Yadav
NDA Vs INDIA : ED, CBI ची गरजच काय? अखिलेश यादवांचा 'असा' आहे प्रस्ताव

अखिलेश यादवांनी याआधीही व्यक्त केला होता विजयाचा विश्वास

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलतानाही अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी 79 जागांवर विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. तर, यावेळी मल्लिकार्जून खरगे यांनी 4 जूनला देशात इंडिया आघाडीचं नवं सरकार स्थापन होणार असल्याचं म्हटलं होतं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com