Dinesh Lal Yadav Nirahua, Simranjit Singh Mann
Dinesh Lal Yadav Nirahua, Simranjit Singh Mannsarkarnama

UP By Election Results : आझमगडमध्ये तेरा वर्षांनी कमळ फुललं

२०१९च्या मोदी लाटेतही निरहुआ यांचा पराभव झाला होता.

नवी दिल्ली : देशातील तीन लोकसभा आणि सात विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या आझमगढ लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीत भाजपचे दिनेश लाल यादव निरहुआ विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार धर्मेंद्र यादव यांचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव करण्यात त्यांना यश आले आहे. (UP By Election Results news update)

प्रदीर्घ काळानंतर आझमगडमध्ये कमळ फुलवण्यात निरहुआला यश आले आहे. तर येथील दहा विधानसभेच्या जागा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या ताब्यात आहेत. आझमगडमध्ये लोकसभा निवडणुकीत १३ वर्षांनी कमळ फुललं आहे.

आझमगड येथे यापूर्वी २००९ मध्ये भाजपचे रमाकांत यादव यांचा विजय झाला होता. त्यानंतर येथे भाजपला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. आझमगड येथे २०१४ मध्ये मुलायम सिंह यादव, २०१९ मध्ये अखिलेश यादव यांनी भाजपचा पराभव केला होता. २०१९च्या मोदी लाटेतही निरहुआ यांचा पराभव झाला होता.

Dinesh Lal Yadav Nirahua, Simranjit Singh Mann
ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष : आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

लोकसभा पोटनिवडणुकीत रामपूर लोकसभा जागेवर समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. येथे भाजपचे धनश्याम लोधी यांनी समाजवादी पक्षाच्या असीम राजा यांचा पराभव केला आहे.

सिमरनजीत सिंग मान विजयी

पंजाबच्या संगरूर मतदारसंघात मोठा पलटवार दिसून येत आहे. शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) उमेदवार सिमरनजीत सिंग मान (Simranjit Singh Mann) यांनी येथे विजय मिळवला आहे. त्रिपुरात सीएम माणिक साहा टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

राजिंदर नगरची जागा 'आप'च्या ताब्यात

दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे. आपचे उमेदवार दुर्गेश पाठक 10867 मतांनी विजयी झाले, तर भाजपचे राजेश भाटिया 27304 मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com