Opposition Meeting in Bengaluru : काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यासह भाजपविरोधी पक्षांच्या नव्या युतीला यापुढे संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) म्हटले जाणार नाही. बेंगळुरू येथे होणाऱ्या भाजपविरोधकांच्या बैठकीत सुमारे २६ पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित लावली आहे. या बैठकीत नवीन नावावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. (Latest Political News)
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) २००४ ते २०१४ पर्यंत केंद्रात दोन वेळा सत्तेत होती. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आघाडीच्या सर्वेसर्वा होत्या. आताही विरोधकांमध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच भाजपविरोधकांची होणारी नवीन आघाडी काम करेल, असा प्रस्ताव काँग्रेसने बैठकीत ठेवल्याची माहिती आहे.
यूपीएचे नाव बदलाबाबत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी.वेणुगोपाल म्हणाले, या विषयावर फक्त काँग्रेस पूर्णपणे निर्णय घेऊ शकत नाही. विरोधकांच्या बैठकीत एकत्रितपणे निर्णय घेतला जाईल. यावेळी आम्ही सर्व निर्णय घेऊ. कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे ते मी आत्ताच सांगू शकत नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून एकजुटीने निर्णय घेतील."
बंगळुरू येथे भाजपविरोधकांची दोन दिवशीय बैठक सुरू आहे. यात या विरोधकांची एकजूट करणे, सर्व पक्षांत किमान समान कार्यक्रामांची आखणी करणे आणि जागावाटपावर सोमवारी चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी (ता. १८) या नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर औपचारिक आणि विधिवत चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजपविरोधक असलेले २६ पक्षांनी सहभाग घेतला आहे. या बैठकीला नवीन आठ पक्षांना आमंत्रण देण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.