Mumbai News: फसवणूक आणि लाचखोरी केल्याच्या आरोपावरुन उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत ठेवण्यात आला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अदानी समूहावर विपरीत परिणाम झाला. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
गौतम अदानी यांच्यासह रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, सागर अदानी, विनीत एस. जैन, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल आदींचा यात समावेश आहे. हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी अदानी खोटे बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिका आणि अन्य देशातील गुंतवणुक कंपन्यासोबत अदानी खोट बोलत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
काल (ता. 20 नोव्हेंबर ) न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमेरिकेतील एका कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी $250 दशलक्ष लाच दिल्याचा आणि प्रकरण लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.अदानी यांनी कालच (बुधवारी) 20 वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.
कंपनीचा हा दावा गौतम अदानी यांनी पूर्णपणे फेटाळला असला, तरी ही बातमी समोर आल्यानंतर अदानी समूहावर विपरीत परिणाम झाला. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स प्रचंड घसरले होते. या लाचखोरीच्या तपासाच्या बातम्याही अनेक महिन्यांपासून येत होत्या. या प्रकरणाचा तपास 2022 मध्येच सुरू झाल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.
बुधवारी (ता.20) रात्री अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानी यांच्यावर आरोप केल्यानंतरदोन दिवस आधी 18 नोव्हेंबरला अदानी एनर्जीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे समभाग 1.33% च्या घसरणीसह बंद झाले. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 2.33% ची घसरण झाली. तो 1457 रुपयांवर बंद झाला.
अदानी टोटल गॅसचे शेअर्स 2.13% च्या घसरणीसह 669.60 रुपयांवर बंद झाले. अदानी यांनी काही महिन्यापूर्वीच अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली होती.
अदानींच्या कोणत्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले?
अदानी ग्रीन एनर्जी- 18.93 टक्के
अदानी पॉवर- 14.53 टक्के
अदानी पोर्ट्स- 10 टक्के
अदानी एनर्जी सोल्यूशन्स- 20 टक्के घसरण
अदानी विल्मर- 10 टक्के
अदानी एन्टरप्राईजेस- 15 टक्के
अदानी टोटल गॅस- 14.70 टक्के
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.