तैपेई : Nancy Pelosi in TAiwan चीनच्या धमकीने अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा अडचणीत आल्याचे वाटत असताना मंगळवारी रात्री स्थानिक वेळेनुसार १०.४५ वाजता त्यांचे विमान तैपेईच्या विमानतळावर उतरले. क्वालांलपूर ते तैपेई यादरम्यान अमेरिकी नौदल आणि हवाई दलाच्या चोवीस लढाऊ विमानांनी नॅन्सी पेलोसी यांच्या विमानास संरक्षण दिले होते. दरम्यान, नॅन्सी पेलोसीच्या तैवान दौऱ्याचे गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. (US House Speaker Nancy Pelosi touches down in Taiwan)
गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकन शिष्टमंडळाचा हा पहिलाचा दौरा तैवानमध्ये होत आहे. नॅन्सी पेलोसीच्या दौऱ्याला चीनने प्रथमपासूनच आक्षेप घेतला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आज पुन्हा अमेरिकेला धमकी देत पेलोसीच्या भेटीवरून अमेरिकेने राजकारण करू नये. ते आगीशी खेळत आहेत. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. परिणाम चांगले होणार नाही, अशा शब्दांत अमेरिकेला धमकावले होते. त्यामुले पेलोसीच्या दौऱ्यावरून उत्सुकता लागली होती. पण चीनच्या धमकीला न जुमानता पेलोसी यांच्या विमानाने क्वालालंपूर येथून तैपेईकडे उड्डाण केले.
लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचे स्वागत तैवानच्या अध्यक्षांनी केले. सुरक्षेच्या कारणामुळे तैपेई विमानतळावर अंधार करण्यात आला होता. तत्पूर्वी चीनने तैवानच्या सीमेवर लष्करी कवायत केली. विशेष म्हणजे अमेरिका, तैवान आणि चीन या तिघांनीही आपापल्या लष्कराला सज्ज राहण्याचे निर्देश दिले . त्याचवेळी तिन्ही देशांच्या सैनिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या सीमेवर गस्त घातली आणि तसेच हवाई हद्दही बंद केली. त्यामुळे पेलोसी यांच्या विमानाने मार्ग बदलण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.