Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तीवर सोपवली मोठी जबाबदारी; FBIच्या संचालकपदी ​​केली नियुक्ती

Kash Patel becomes FBI Director gets approval from senate: पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असून ते ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर कम करतील, रिपब्लिकन नेत्यांचे विरोधक त्यांच्या निशाण्यावरील असतील, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांचे म्हणणं आहे.
kash patel becomes fbi director gets approval from senate
kash patel becomes fbi director gets approval from senate Sarkarnama
Published on
Updated on

FBI Director Kash Patel:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारतीय मित्रावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मूळ भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्तीला सीनेटने हिरवा झेंडा दाखवला आहे. सीनेटमध्ये झालेल्या मतदानानुसार 51-49 या फरकाने काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल हे एफबीआयचे नववे संचालक आहेत.

अमेरिकेचे, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कश्यप उर्फ ​​काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआय(FBI)च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी काश पटेल यांच्या नियुक्तीस विरोध केला आहे. या पदासाठी काश पटेल अयोग्य असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पटेल हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असून ते ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर काम करतील, रिपब्लिकन नेत्यांचे विरोधक त्यांच्या निशाण्यावरील असतील, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांचे म्हणणं आहे.

एफबीआयच्या कार्यशैलीवर यापूर्वी काश पटेल यांनी टीका केली होती, आता तेच त्याचे प्रमुख झाले आहेत. काश पटेल यांना ट्रम्प यांचे 'हनुमान 'असे अमेरिकेत संबोधले जाते.

फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यावर काश पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. "एफबीआयच्या नवव्या संचालकपदी माझी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आणि अँटर्नी जनरल बॅाडीचे सदस्य यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी धन्यवाद," असे पटेल यांनी म्हटलं आहे.

kash patel becomes fbi director gets approval from senate
Uddhav Thackeray: पुणे महापालिकेच्या आखाड्यात उतरण्यासाठी ठाकरेंच्या 180 सैनिकांनी थोपटले दंड

कोण आहेत काश पटेल

मूळ भारतीय वंशाचे असलेले काश पटेल सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ते न्यूयॉर्क मध्य हैगार्डन शहरात राहतात.त्यांचे आई-वडील गुजराती होते. त्यांचा परिवार 1970 च्या दशकाच्या सुरवातीलाच विदेशात गेला होता. पहिल्यांदा ते युगांडा येथे राहत होते. त्याठिकाणी जातीय भेदभाव झाल्याने ते युगांडा सोडून कॅनडा येथे गेले. काश पटेल यांचे वडील एका विमान कंपनीमध्ये अधिकारी होते. कालांतराने ते अमेरिकेत वास्तव्यास गेले.

काश पटेल यांनी यूनिवर्सिटी ऑफ रिचमंड येथून वकीलीमध्ये पदवी घेतली आहे. ते अविवाहीत आहेत. ट्रम्प याचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात पटेल हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत राष्ट्रपतींचे उप सहाय्यक आणि दहशतवादविरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक होते. ट्रम्प यांच्या त्या कार्यकाळात पटेल यांनी अनेक मोठ्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com