राहुल गांधींच्या 'यंग ब्रिगेड'मधील नेत्याला भाजप करणार मंत्री!

मंत्रिमंडळ विस्तार रविवारी सायंकाळी होणार आहे. या विस्तारात सहा नव्या मंत्र्याना स्थान मिळणार आहे.
BJP, Congress
BJP, CongressFile Photo
Published on
Updated on

लखनऊ : पंजाबमध्ये काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातही रविवारीच (ता. 26) विस्तार होणार आहे. यामध्ये सहा नव्या मंत्र्यांना जागा मिळणार असल्याचे समजते. त्यापैकी एक मंत्रिपद काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद यांना मिळण्याची शक्यता आहे. जितिन प्रसाद हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेत्यांपैकी एक होते.

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी सायंकाळी होणार आहे. या विस्तारात सहा नव्या मंत्र्याना स्थान मिळणार आहे. त्यामध्ये प्रसाद यांचंही नाव आहे. उत्तर प्रदेशातील ब्राम्हण चेहरा म्हणून जितिन प्रसाद यांची ओळख आहे. ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. जून महिन्यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर तीन महिन्यांतच त्यांना योगी सरकारमध्ये मंत्री बनवले जाणार आहे.

BJP, Congress
सर्वात श्रीमंत काँग्रेस आमदाराला मंत्री करण्यास विरोध

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून आज मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जितिन प्रसाद यांच्यासह निषाद पक्षाचे संजय निषाद हेही मंत्री बनू शकता. जितिन हे ब्राम्हण तर निषाद हे ओबीसी समाजाचे असल्यानं भाजपकडून जातीय समीकरणांचा विचार करून मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक, गुजरात व उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही बदलण्याची चर्चा सुरू होती. पण पक्षश्रेष्ठीनं पुन्हा एकदा योगी यांच्यावरच विश्वास दाखवत केवळ मंत्रिमंडळ विस्तार कऱण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणुका योगींच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहेत.

BJP, Congress
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? काँग्रेसच्या प्रभारींनी दिलं उत्तर

दरम्यान, पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (ता.26) होणार आहे. पण या विस्ताराच्या काही तास आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. प्रस्तावित विस्ताराच्या यादीत नाव असलेल्या एका आमदाराला मंत्री करण्यास सहा आमदारांनीच विरोध केला आहे. या आमदारांनी थेट प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना पत्र लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com