Uttarakhand :भाजप अन् कॉग्रेसमध्ये ३६ चा आकडा ; कोण होणार मुख्यमंत्री?

उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन करणार हे काही तासातच समजणार आहे.
uttarakhand assembly election 2022
uttarakhand assembly election 2022sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झाले आहे. आज (गुरुवार) सकाळी मतमोजणीस सुरवात झाली आहे. दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक आतापासून वाढली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६चा आकडा गाठण्यासाठी भाजप-कॉग्रेसने देव पाण्यात ठेवले आहेत. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. (uttarakhand assembly election 2022)

भाजप आणि कॉग्रेस दोन्हीही सत्तेचे दावेदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची नजर मतमोजणीच्या प्रत्येक जागेवर आहे. यावेळी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे काँग्रेसने उत्तराखंडमध्ये विजयाचा आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते देखील प्रचारासाठी उत्तराखंडमध्ये आले होते. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन करणार हे काही तासातच समजणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय आणि केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी येथे आले आहेत. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सोमवारी विविध संस्थांचे एक्झिट पोल आल्यानंतर भाजपने निकालानंतर आपली रणनिती ठरवली आहे. भाजपचे उमेदवार आपल्या मतदार संघात किंवा जिल्ह्याच्या पक्षकार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

uttarakhand assembly election 2022
फडणवीसांच्या दौऱ्यानंतरही गळती सुरुच, आणखी दोन नगरसेवकांनी दिले राजीनामे

माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या निकालावर नजर

कॉंग्रेसच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. सर्वांची नजर लालकुआं विधानसभा जागेवर आहे. कारण येथून माजी मुख्यमंत्री हरीश रावत (harish rawat) निवडणूक लढवित आहेत. निकालानंतर उत्तराखंडमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली तर किंवा बहुमताच्या जवळ पोहचल्यावर आपल्या नवनिर्वाचित आमदारांना राजस्थान येथे रवाना करण्याची योजना आहे. यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत.

बहुमतासाठी ३६ जागा आवश्यक

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने 2016 मध्ये काँग्रेसचे सरकार अस्थिर झाले होते. तशी परिस्तिथी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी खेळलेला 'डाव' कॉग्रेस अजून विसरली नाही. त्यामुळे कॉग्रेसची नजर सर्व विधानसभा मतदार संघावर आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६चा आकडा गाठण्यासाठी भाजप-कॉग्रेसने देव पाण्यात ठेवले आहेत.

48 जागा मिळणार : रावत

मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस 70 पैकी 48 जागा मिळणार असल्याचे रावत म्हणालेत. 48 च्या आसपास जागा काँग्रेसला मिळतील. उत्तराखंडसाठी गेली पाच वर्षे खूप कठीण गेली आहेत. लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे. अशा स्थितीत लोकांनी परिवर्तनाला कौल दिल्याचे दिसून येत असल्याचे रावत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com