Badrinath Glacier Collapse : बद्रीनाथमध्ये तुफान बर्फवृष्टी, हिमकडा तुटला; 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले

Uttarakhand Badrinath glacier break 57 workers massive snow Rescue successfully 16 people : बद्रीनाथ धाममध्ये बर्फवृष्टीमुळे हिमकडा तुटला असून, त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले आहेत.
Badrinath Glacier Collapse
Badrinath Glacier CollapseSarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand Rescue Operation : हवामानात पुन्हा एकदा वेगाने बदल होत असून, हिमालयीन भागात बर्फवृष्टी वाढली आहे. याचबरोबर सखल भागात पावसाला सुरवात देखील झाली आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.

बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुपारी येथे मोठी नासधूस झाली. प्रचंड हिमवृष्टीनंतर हिमकडा तुटला. त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले. मात्र, 16 मजुरांना वाचवण्यात यश आले आहे.

प्रशासन आणि बीआरओ टीमला बदलत्या हवामानाची (Weather) माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळ 57 मजूर हिमकड्याखाली गाडले गेले. मात्र, 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 41 मजुरांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी संपर्क यंत्रणा उच्च पातळीवर असल्याने अचूक माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.

Badrinath Glacier Collapse
Kalyan Singh: उत्तरप्रदेशात हिंदुत्व रुजवणारा भाजपचा सर्वात मोठा चेहरा

चमोलीच्या वरच्या भागात अनेक दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत, असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने याआधीच आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. 3 हजार 200 मीटरच्या वरच्या भागातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आता बद्रीनाथ मंदिरापासून (Temple) तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माना घस्तौलीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे.

Badrinath Glacier Collapse
Top Ten News : दत्ता गाडेला अटक, कराडला 'व्हीआयपी ट्रीटमेंट', खबऱ्याला 1 लाख... -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे आर्मी बेस कॅम्प आहे. त्यामुळे लष्कर प्रथम बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. बीआरओच्या पथकांनीही हिमस्खलनाबाबत बचावकार्य सुरू केले आहे. जोशीमठ येथून जवळच्या चौकीतून एसआय देविदत्त बर्थवाल यांच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली. तसेच, गौचर आणि सहस्रधारा पोस्ट, डेहराडून येथे उच्च उंचीवरील बचाव पथक तयार करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले

सीएम पुष्कर सिंह धामी यांनीही सोशल मीडियावर या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. चमोली येथील माना गावाजवळ बीआरओने केलेल्या बांधकामादरम्यान हिमस्खलनामुळे अनेक मजूर गाडल्याची दुःखद बातमी मिळाली. ITBP, BRO आणि इतर बचाव पथकांद्वारे मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो, असे पुष्कर सिंह यांनी म्हटले.

केदारनाथमध्येही जोरदार बर्फवृष्टी

दोन दिवसांपासून डोंगराळ भागात हवामान खराब आहे, त्यामुळे उंच भागात बर्फवृष्टी आणि सखल भागात पाऊस पडत आहे. केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टीमुळे थंडीची तीव्रता चांगलीच वाढली आहे. येथे आयटीबीपीसह पोलिस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. कडाक्याच्या थंडीतही सैनिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. येथे तीन ते चार इंच बर्फ साचला आहे. केदारनाथ धामशिवाय मदमहेश्वर आणि तुंगनाथ धाममध्येही बर्फवृष्टी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com