गोव्यात भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना यश मिळालं आहे. भाजप गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर येत आहे. मात्र अद्याप बहुमतापासून भाजप लांबचं आहे. त्यामुळे गोव्यात आता देवेंद्र फडणविस यांना सत्ता स्थापनेसाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत.
त्यासाठी घोडेबाजार किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मनधरणी करावी लागणार आहे. सध्याच्या आकड्यांनुसार गोव्यात भाजपला ४० पैकी १८ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेसला केवळ ११ जागांवर आघाडी आहे. सुदिन ढवळीकर यांच्या मगोपला ५ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी गोव्यात भाजपला मगोपला सोबत घ्यावं लागणार आहे किंवा इतर पक्षातील आमदारांना फोडावं लागणार आहे.
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मोठे उलटफेर केले आहेत. सुरुवातीला आलेल्या निर्णायक कलांमध्ये आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसतं असून तब्बल ८८ जागांवर पक्ष आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या १३ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला अवघ्या ५ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा सत्ताधारी असलेला शिरोमणी अकाली दल अवघ्या १० जागांवर यशस्वी होताना दिसत आहे.
विधानसभेतील या आकड्यांमुळे आता सत्ताधारी काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पदासाठी धडपड करावी लागणार आहे. कारण संसदीय नियमानुसार विधानसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के जागा जिंकल्या असल्यास तरच विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगता येतो. म्हणजेच एकूण ११७ जागांपैकी कमीत कमी १२ जागा जिंकल्या तरच काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळू शकते.
मणिपूरमध्ये काँग्रेसची भाजपला टफ फाईट
भाजप - २५
काँग्रेस - १४
एनपीएफ - ०६
एनपीपी - ११
उत्तराखंडमध्ये भाजपा ४१, कॉंग्रेस २५ तर अन्य ५ जागांवर आघाडीवर.
कॅप्टन अमरिंदर सिंह, सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंह बादल, चरणजीत चन्नी, नवजोत सिंह सिद्धू असे पंजाबच्या राजकारणातील सगळे दिग्गज सध्या पिछाडीवर.
(पंजाबमध्ये 10.25 वाजेपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार)
भाजप - 05,
काँग्रेस - 12
आप - 88
शिरोमणी दल - 11
(उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक)
सकाळी 10:00 वाजेपर्यंतचे कल
भाजप : 22
सपा : 93
बसपा : 5
काँग्रेस : 4
इतर : 6
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल.
भाजप - ०५
काँग्रेस - १७
आम आदमी पक्ष - ८३
अकाली दल - १७
गोव्यात काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच; भाजप २१ तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर.
पणजीतून बाबुश मोंसेरात पणजी येथून ३८३ ने आघाडीवर
विजय सरदेसाई देखील ५९३ मतांनी आघाडीवर
जोशुआ डिसुझा १५१ तर दयानंद माेंडलेकर १५७ मतांनी आघाडीवर
(उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक)
सकाळी 9:30 वाजेपर्यंतचे कल
भाजप : 165
सपा : 82
बसपा : 5
काँग्रेस : 2
इतर : 2
गोव्यात भाजपचे कमळ आघाडीवर पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळीतून मतदारसंघातून पिछाडीवर. भाजप १८ जागांवर तर काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर. तृणमूलची ४ जागांवरील आघाडीवर कायम.
'लोकतंत्र के सिपाही' विजयाचे प्रमाणपत्र घेवूनच परतणार! अखिलेश यादव यांनी व्यक्त केला विश्वास.
उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर असून भाजप ३० तर काँग्रेस २६ जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यात सकाळी ९ वाजेपर्यंत भाजप १६ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेस देखील ४ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात पणजीतून उत्पल पर्रिकर देखील पुढे आहे. (goa assembly election results)
उत्तरप्रदेशमध्ये पहिले कल हाती आले असून ४०३ जागांमध्ये १११ जागांमध्ये भाजप आघाडीवर असून ७० जागांवर समाजवादी पक्ष पुढे आहे. बसपा ४ तर काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्लीतल्या आप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची उत्साही पोस्टरबाजी. पंजाबमधील विजयाच्या शुभेच्छा.
पंजाबमध्ये ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्षाने तब्बल ३४ जागांवर आघाडी घेतली आहे. अकाली दल ७ जागांवर आघाडीवर आहे. (Punjab assembly election live updates)
पंजाबमध्ये एकूण ११७ जागांवर मतदान पार पडले होते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७६, आम आदमी पक्षाने १२, शिरोमणी अकाली दलाने १३, आणि भाजपने ६ जागा जिंकल्या होत्या. तर एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार यंदा पंजाबमध्ये 'आम आदमी पक्ष' सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील सत्ता आमचीच येईल असा दावा केला आहे. (punjab assembly election results)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.