Girish Mahajan : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, महाराष्ट्राचे 151 पर्यटक अडकले; गिरीश महाजन मदतीसाठी रवाना

Uttarakhand tragedy : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे झालेल्या ढगफुटीत मोठी हानी झाली आहे. येथे महाराष्ट्रातील पर्यटकही अडकले आहेत. त्या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत.
Girish Mahajan on Uttarakhand tragedy
Girish Mahajan on Uttarakhand tragedysarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात महाराष्ट्रातील 151 पर्यटक अडकले असून, त्यांना सुरक्षित परत आणण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

  2. मंत्रालयातील आपत्कालीन कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले.

  3. राज्याचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन पर्यटकांची मदत करण्यासाठी थेट उत्तराखंडला रवाना झाले आहेत.

Uttrakhand tragedy News : दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे ढगफुटी झाली. त्यामुळे मोठा पूर येऊन अर्ध गाव पूर्णतः मातीखाली गाडले गेले. या भागात देशभरातील असंख्य पर्यटक अडकल्याची माहिती आहे. यात महाराष्ट्रातील 151 पर्यटक दुर्घटनाग्रस्त उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात अडकले आहेत. त्या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याच्या सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या सूचना त्यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिल्या आहेत. यानंतर राज्याचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना झाले आहेत. (151 tourists from Maharashtra are reported to be stranded in the Dharali area where the cloudburst occurred in Uttarakhand)

उत्तरकाशी येथे ढगफुटी झाल्याने मोठा पूर आला. ज्यात अर्ध गाव पूर्णतः मातीखाली गाडले गेले. यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 151 पर्यटक अडकले असून त्यांना परत आणण्याची मोहिम राज्य सरकारने हाती घेतली आहे. यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना झाले आहेत. महाजन धाराली परिसरात जाऊन महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना मदत करणार आहेत. त्यांच्या परतीच्या व अन्य सुविधांबाबत व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष देखील स्थापन केला आहे.

Girish Mahajan on Uttarakhand tragedy
Girish Mahajan Politics: नाशिकचे पालकमंत्री कोण? ‘असा’ झाला गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा?

उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात ढगफुटीने मोठा पूर आल्याने हाहाकार माजला आहे. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC) कडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाने देखील या यंत्रनेशी समन्वय प्रस्थापित केला आहे. तिच्या मार्फत महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत केली जात आहे.

महाराष्ट्राच्या आपत्कालीन केंद्रातील प्रशासनाकडून 151 पैकी 130 पर्यटकांची संपर्क झाला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी आज आपातकालीन आढावा बैठक घेतली. या बैठकीतून पर्यटकांची संपर्काची व्यवस्था झाली. उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंदवर्धन यांच्याशीही राज्य शासनाच्या वतीने संवाद साधण्यात आला.

थराली परिसरात अडकलेल्या पर्यटकांना विशेष हेलिकॉप्टरने गंगोत्री येथे हलविण्यात येणार आहे. हर्शील या गावाजवळ लष्कराचे हेलिपॅड्स उपलब्ध आहेत. या भागात गंगोत्री ते हर्षल या मार्गावर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस अडकलेल्या पर्यटकांना सर्व प्रकारची मदत करून सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अडकलेल्या पर्यटकांचे शेवटचे स्थान किंवा संपर्क झाल्याची माहिती घेण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनची मदत घेतली जात आहे. यासंदर्भात आज उत्तराखंड रवाना झालेले पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन राज्य शासन तसेच पर्यटक यांच्याशी समन्वय निर्माण करून त्यांना सुखरूप परतण्यासाठी व्यवस्था करणार आहेत.

Girish Mahajan on Uttarakhand tragedy
Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांचे वेगळेच संकेत, जळगावची सगळी समीकरणं बदलणार..

FAQs :

प्र.1: किती पर्यटक अडकले आहेत आणि कुठे?
उ: एकूण 151 पर्यटक महाराष्ट्रातून गेले होते आणि ते उत्तरकाशीच्या धाराली परिसरात अडकले आहेत.

प्र.2: सरकारने कोणती कारवाई केली आहे?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याचे आदेश दिले आहेत आणि गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना झाले आहेत.

प्र.3: पर्यटक सुरक्षित आहेत का?
उ: होय, सध्या सर्व पर्यटक सुखरूप आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी बचाव मोहीम सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com