Congress Vs BJP : मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्र्याला लिहिता आला नाही, 'बेटी बचाओ, बोटी पढाओ' संदेश...

Union Minister Of State For Women And Child Development Savitri Thakur : केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना बेटी बचाओ, बोटी पढाओ हा संदेश लिहिता आला नाही. मध्यप्रदेशमधील एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.
Savitri Thakur
Savitri Thakursarkarnama

Congress Vs BJP News : मोदी 3.0 सत्तेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी राष्ट्रपती भवन परिसरात पार पडला. सावित्री ठाकूर यांना केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री पद मिळाला. या राज्यमंत्र्या एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे.

त्यांना 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', हा संदेश एका बोर्डावर लिहिता आलं नाही. त्यांनी 'बेटी पडाओ बच्चाव', असं लिहून आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन केलं. ज्यापद्धतीने केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संदेश दिला त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी शाळेतील 'स्कूल चलें हम', या उपक्रमात भाजपच्या (BJP) केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर सहभागी झाल्या होत्या. बारावी पास झालेल्या सावित्री ठाकूर ह्या तो संदेश नीट लिहू शकल्या नाहीत. काँग्रेसने यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्याची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा यांनी यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर त्यांनी शेअर केला.

Savitri Thakur
Rahul Gandhi : 'एनडीएचे लोक I.N.D.I.A च्या संपर्कात, भाजपच्या मित्र पक्षात असंतोष'

काँग्रेसचे (Congress) केके मिश्रा यांनी या व्हिडिओवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 'याला देशाचं दुर्दैवं समजायच की, लोकशाहीचा नाईलाज. देशाचं संविधान की, आपलं शिक्षण धोरण याला जबाबदार आहे', असे म्हणत भाजपची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या या टीकेला भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

Savitri Thakur
Prashant Kishor : यावेळी लिहून देतो बिहारमध्ये कोणाची सत्ता, प्रशांत किशोरांनी दिले चॅलेंज

भाजपचे प्रवक्ते हितेश बाजपेयी यांनी देखील काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या काळात आदिवासी मुली कोणत्या काळात शिक्षण घेऊ शकल्या याचा विचार करा. राहुल यांना जमले नाही ते या आदिवासी मुलीनं करून दाखवलं. कठीण परिस्थितीमध्ये बारावीचं शिक्षण घेतलं. आता भाजपने त्यांना केंद्रीय मंत्री केले आहे.

या मुलीनं कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या मुलींना मदत करेल, अशी शपथ घेतली. तुम्ही आणि काँग्रेसने आदिवासी महिलांचा अपमान करण्याची शपथ घेतली आहे. देश आणि महिला तुमच्या महिलाविरोधा मानसिकतेला कधीच माफ करणार नाही. आदिवासी कुटुंबात जन्माला आला की तुम्हा समजेल, अशा कडक शब्दात हितेश बाजपेयी यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com