Vidhansbha Elections : काँग्रेसची 'I.N.D.I.A' आघाडीतील मित्र पक्षांमुळेच तीन राज्यांत अडचण!

INDIA Alliance News : 'या' शंभर जागांवर होणार आहे तिरंगी लढत!
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesarkarnama
Published on
Updated on

Congress News : आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसपुढे 'I.N.D.I.A' आघाडीतील मित्रपक्षानेच आव्हान उभे केले आहे. विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थानमधील सुमारे १०० जागांवर तिरंगी लढतीची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

'I.N.D.I.A' आघाडीतील मित्रपक्षानेच काँग्रेस पुढे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व डाव्या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mallikarjun Kharge
Caste Based Census : जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, पण... ; अमित शाहांचं मोठं विधान

'I.N.D.I.A' आघाडीच्या मित्रपक्षाचेच शंभरपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेसच्या व्होट बँकेवर होऊ शकतो. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

याबाबत मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी 'I.N.D.I.A' आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याच्या सर्व सूचनाकडे दुर्लक्ष केले आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत ३००० पेक्षा कमी फरकाने ३० जागी उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी १५ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

कमलनाथ यांनी काही जागांवर सामावून घेत त्यांचे मन वळण्याचा प्रयत्न केला होता,परंतु माघार घेण्यास ही मंडळी तयार नव्हती. काँग्रेसच्या अडचणीत भर घालण्यासाठी 'बसपा' आणि 'जीजीपी' यांनीही आघाडी केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे.

Mallikarjun Kharge
Raghav Chadha suspension : सभापतींची बिनशर्त माफी मागा आणि... ; सर्वोच्च न्यायालयाचा खासदार राघव चड्ढांना सल्ला

राजस्थानमध्ये 'आरएलपी'ने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसबरोबर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर अनेक ठिकाणी बंडखोर मैदानात उतरले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची लहान पक्षांना सामावून घेण्याची भूमिका आहे. परंतु, यात पक्षांतर्गत अडचणी येत आहेत.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com