Brij Bhushan Singh
Brij Bhushan SinghSarkarnama

WFI President Brij Bhushan Singh: भाजप खासदार, WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात कुस्तीपटुंची न्यायालयात धाव

FIR Against WFI President Brij Bhushan Singh: चौकशी समितीकडून दिल्ली पोलिसांनी अहवाल मागवला आहे.
Published on

Seeking FIR Against WFI President Brij Bhushan Singh: लैगिंक छळवणुकीबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष, भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआय दाखल करा, या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दोन दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. तीन महिन्यापूर्वी असेच आंदोलन करण्यात आले होते. विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह सात कुस्तीपटुंनी आज याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीकडून दिल्ली पोलिसांनी अहवाल मागवला आहे.

Brij Bhushan Singh
YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिलांनी पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ; Video व्हायरल

भारतीय कुस्ती महासंघचे प्रमुख आणि प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणाचा वर्षाच्या सुरुवातीलाच आरोप केला होता. आता भारतीय कुस्तीपटुंनी नवीन पोलीस तक्रार दाखल केली आहे.

जंतर-मंतरवर निषेध हे कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत. मध्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात सात महिला कुस्तीपटूंनी महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

Brij Bhushan Singh
Mamata - Nitish Meeting: मोदींच्या विरोधात एकजूट ; देशातील तीन बड्या नेत्यांमध्ये खलबते..

सात मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक आहे. या निवडणूकीत क्रीडा आचारसंहितेचे पालन केले जाणार आहे. सरचिटणीस व्ही. एन. प्रसूद यांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या तातडीच्या सर्वसाधारण आणि प्रशासकीय समितीच्या बैठकीत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काल (रविवारी) भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी, महासंघात आपण एखाद्या नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com