भाजपवर ओढावू शकते नामुष्की; दोन घरातच चार मंत्रिपदांसाठी लॉबिंग

Goa | Vishwajeet Rane | Babush Monserat | : आधी तिकीट आणि आता मंत्रिपदासाठी नेत्यांची जोरदार लॉबिंग सुरु
BJP
BJPSarkarnama

पणजी : गोवा विधानसभेत भाजपला बहुमत मिळाले नसले तरी अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा मिळालल्याने बहुमताचा आकडा सहज गाठण्यात यश आले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यासाठीची खलबत सुरु असून, त्याबाबात उद्या घोषणा होणार आहे. यासाठी केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरूगन मंगळवारी गोव्यात येत आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री पदासाठीची ही खलबत सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला मंत्रिपदासाठी आणि त्यातही वजनदार खाती मिळावीत देखील लॉबिंग सुरु केले आहे. यात राणे आणि मोन्सेरात हे नेते आघाडीवर आहेत. भाजपच्या विश्वजित राणे आणि बाबुश मोन्सेरात या नेत्यांनी तिकीट वाटपात आपल्या पत्निंसाठी तिकीट खेचून आणले. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणविस यांनी ते दिले देखील.

भाजपने वाळपई मतदारसंघातून विश्वजीत प्रतापसिंग राणे यांना तर पर्ये मतदारसंघातून त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना तिकीट दिले. त्याचसोबतच पणजीतून बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) आणि ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. चार तिकीट दोन घराच दिल्याने भाजपच्या 'वन फॅमिली-वन तिकीट' या घोषणेवर बरीच टीका झाल्याच पाहायला मिळाले.

मात्र या टीकांनंतर ही हे चौघेही जण विजयी झाले. त्यानंतर आता या चौघांनी देखील मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे. बाबूश मोन्‍सेरात यांना पत्‍नीसह मंत्रिपद हवे आहे. जेनिफर मोन्‍सेरात यांना मंत्रिमंडळातून वगळल्‍यास त्‍यांच्‍या जागी एकमेव उरलेल्‍या डॉ. दिव्‍या राणे यांना मंत्रिपद दिले जावे, यावर विश्‍वजीत यांच्‍यासह अनेकांची साथ आहे. कारण मंत्रिमंडळात महिला असावी, असे पक्षश्रेष्‍ठींनाही वाटते. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळाच्या यादीकडे देखील लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com