भारतीय ध्वजामुळे झाली युक्रेनमधून सुटका; विद्यार्थ्याने सांगितला 'तो' प्रसंग

Russia-Ukraine war| Mission Ganga| मिशन गंगा च्या अंतर्गत काल युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.
भारतीय ध्वजामुळे झाली युक्रेनमधून सुटका; विद्यार्थ्याने सांगितला 'तो' प्रसंग
Published on
Updated on

नवी दिल्ली: "भारतीय ध्वजामुळे आम्हाला सहज मंजुरी मिळाली; पडदा आणि कलर स्प्रे वापरून ध्वज तयार केला, फक्त भारतीय विध्यार्थी च नाही तर पाकिस्तानी आणि टर्किश विद्यार्थ्यांना ही या ध्वजामुळे युक्रेन मधून बाहेर पडण्याची संधी मिळाली.' मिशन गंगा अंतर्गत मंगवारी (१ मार्च) युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले. याचा एक अनुभव एक विद्यार्थ्यांने ANI वृत्त संस्थेला सांगितला.

रशिया युक्रेनच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच भयावह होत चालली आहे. असे असतानाच युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले. मिळेल त्या वाहनाने कीव सोडा, असं दुतावासाकडून स्पष्ट केले.

भारतीय ध्वजामुळे झाली युक्रेनमधून सुटका; विद्यार्थ्याने सांगितला 'तो' प्रसंग
धक्कादायक : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी

दरम्यान, भारतात परतल्यानंतर एक विद्यार्थ्यांने दिलेल्या मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला. "भारतीय ध्वजामुळे आम्हाला सहज मंजुरी मिळाली; पडदा आणि कलर स्प्रे वापरून ध्वज तयार केला. भारतीय ध्वज आणि भारतीय या दोघांचीही पाकिस्तानी, तुर्की विद्यार्थ्यांना मोठी मदत झाली," असे भारतीय विद्यार्थ्यांनी बुखारेस्टमध्ये आल्यानंतर सांगितले.

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तेथून भारतात आणण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कीव्हमध्ये रशियाकडून (Russia) हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी कीवमध्ये अडकले आहेत. मागील सहा दिवसांपासून केंद्र सरकाकडून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडिया व इतर खासगी विमान कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड हजार नागरिक परत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com