Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

Arvind Kejriwal News : केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप..
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama

Arvind Kejriwal Delhi excise policy case : आम आदमी पक्षाचे नेते (AAP) व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

आपचे एक बडे नेते अडचणीत असताना, आता आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आता सीबीआयने समन्स बजावले आहे. यानंतर आता आपचे प्रवक्ते व नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर आपचे नेते संजय सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे, असा आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. यामुळे आता राजधानीतच मोठा राजकीय संघर्ष पेटलेला आहे.

Arvind Kejriwal News
Karnataka Election : कर्नाटकातही काका-पुतण्याची जोडी हीट : भाजपकडून दोघांनाही विधानसभेचे तिकिट!

काय म्हणाले संजय सिंह ?

संजय सिंह म्हणाले, "देशासमोर तुमचे सगळे काळे पराक्रम उजेडात आणण्याचे काम अरविंद केजरीवालींनी केले आहे. हे काम चालूच राहील, थांबणार नाही. १६ तारखेला केजरीवालांना अटक करण्याची, केजरीवालांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला गेला आहे. मात्र या कट कारस्थानामुळे अरविंद केजरीवालांचा आवाज दबणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : मद्य विक्री घोटाळा प्रकरण : केजरीवालांना सीबीआयचे समन्स; अडचणी वाढणार?

सीबीआयचा काय आहे समन्स :

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत येवून पोहोचला आहे. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचीही सीबीआय चौकशी करणार आहे. केजरीवालांना 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजाण्यात आले आहेत. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर राहणार का?

दरम्यान, दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली. त्यानंतर आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com