Waqf Amendment Bill : 'वक्फ' विरोधात सुनावणी कधी? सरन्यायाधीशांनी सिब्बलांना करुन दिली न्यायव्यवस्थेची आठवण

Chief Justice Sanjiv Khanna ON Waqf Board Hearing: याचिकेची क्रमवारी ठरविण्यात येणार आहे. लवकरच सुनवाई करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. आपल्याला याबाबतची मागणी करण्याची गरज नाही.
Waqf Board Hearing
Waqf Board HearingSarkarnama
Published on
Updated on

राज्यसभा खासदार व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात असलेल्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी व्हावी, अशी मागणी देशाचे मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली आहे. सिब्बल यांनी खन्ना यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे पत्र दिले.

संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जमीयत उलेमा-ए-हिंद यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत कपिल सिब्बल यांचे म्हणणे ऐकूण घेतले. या प्रकरणी अनेक याचिका दाखल असून त्यांची क्रमवारी ठरवून याबाबतची सुनावणी लवकरच करण्यात येईल, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले.

Waqf Board Hearing
Deenanath Hospital Case: तपासाची चक्रे फिरली! गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांचे मोठे पाऊल

पत्र वाचून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहे. याचिकेची क्रमवारी ठरविण्यात येणार आहे. लवकरच सुनवाई करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. आपल्याला याबाबतची मागणी करण्याची गरज नाही. मी दुपारी याबाबतची सध्य परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी कपिल सिब्बल यांना सुनावले.

Waqf Board Hearing
Ajit Pawar Politics: अजितदादांची 'छत्रपती' मध्ये खेळी, पडसाद माळेगाव कारखान्यात!

लोकसभा आणि राज्यसभेत प्रर्दीघ चर्चेनंतर वक्फ विधेयकावरील दुरुस्तीला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या कायद्याला मंजुरी दिली आहे.

वक्फ विधेयकाविरुद्ध बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये ते मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव करणारे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली. तर राज्यसभेत वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. यामुळे हे विधेयक दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com