आर्यन खान ड्रग्जचा तपास करणारे संजय सिंह कोण आहेत? सविस्तर वाचा

दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात संजय सिंह (sanjay singh) हे कार्यरत आहेत. त्यांनी ओडीशाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
sanjay singh
sanjay singhsarkarnama

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणाचा तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे (ncb) मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याकडून काढून तो दिल्ली एनसीबीच्या टीमकडे सोपविण्यात आला आहे. त्याचे नेतृत्व संजय सिंह (sanjay singh) हे करणार आहेत. ते शनिवारी दिल्ली येथून मुंबईत दाखल झाले आहेत.

दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात संजय सिंह (sanjay singh) हे कार्यरत आहेत. त्यांनी ओडीशाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. संजय सिंह कोण आहेत, हे जाणून घेऊया!

  • संजय सिंह हे 1996 च्या भारतीय पोलीस सेवा (IPS) ओडीशाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत.

  • ओडीशाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर त्यांची बदली दिल्ली एनसीबीच्या मुख्यालयात करण्यात आली.

  • ओडीशात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना ते ड्रग्ज टास्क फोर्सचे प्रमुख होते.

  • त्यावेळी त्यांनी ओडीशातील अंमली पदार्थांचं रॅकेट मोडून काढण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली.

  • अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते.

  • संजय सिंह यांनी एनसीबीचे उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.

  • संजय सिंह यांनी २०१० मध्ये कॉमनवेल्थ गैरव्यवहाराची चैाकशी केली होती.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळच वळण लागल. पंच प्रभाकर साईल यानेही वानखेडेंवर गंभी र आरोप केले आहेत. या प्रकरणातील पंच किरण गोसावी सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे.

sanjay singh
एसटी कर्मचाऱ्यांनो, मंत्रालयाच्या आवारातच संसार थाटा ; पडळकर आक्रमक

समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कारवाई करून आर्यन खानला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर खोटी कागदपत्रं सादर करून आरक्षण मिळवल्याचे, धर्म बदललेला लपवल्याचे, निकाह आणि तलाक लपवल्याचे आरोप केले होते. तसंच त्यांच्या उंची राहणीमानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ज्यानंतर समीर वानखेडेंकडून ही प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com