Delhi Women MLA : दिल्लीत यंदा केवळ पाच महिला MLA; तरुण आमदारांची संख्याही घटली!

Delhi Vidhansabha Women MLA : २०२०मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आठ महिलांनी विजय मिळवला होता.
BJP AAP And Delhi Vidhansabha
BJP AAP And Delhi VidhansabhaSarkarnama
Published on
Updated on

Delhi MLA's information : दिल्लीच्या आठव्या विधानसभेत महिलांची भागीदारी कमी झाली आहे. मात्र यंदा पोस्ट ग्रॅज्युएट आमदारांच्या संख्येत भर पडली आहे. पीआरएस लेजिसलेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

या रिपोर्टनुसार शनिवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा केवळ पाच महिलांना निवडणुकीत विजय मिळाला आहे. दिल्ली विधानसभेत आमदारांच्या एकूण संख्येच्या सात टक्के ही संख्या आहे. यापैकी चार महिला आमदार या भाजपच्या(BJP) आहेत, आम आदमी पार्टीच्या आतिशी या एकमेव महिला आमदार बनल्या आहेत.

BJP AAP And Delhi Vidhansabha
Modi on Congress Double hat trick: ''दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने केली शून्याची डबल हॅटट्रिक'' ; मोदींनी लगावला हटके टोला!

२०२०मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election)आठ महिलांनी विजय मिळवला होता. २७ वर्षांनंतर भाजपने दिल्लीत सत्ता ताब्यात घेतली आहे. भाजपला या निवडणुकीत ७० जागांपैकी ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आम आमदी पार्टीला केवळ २२ जागांवरच समाधान मानावं लागलेलं आहे.

पदवीधर आमदारांची संख्या यंदा वाढून ३८ टक्के झाली आहे. सातव्या विधानसभेत केवळ ३४ टक्के आमदार पदवीधर होते. तेच पदव्युत्तर पदवीधर आमदारांच्या संख्येत काही बदल झालेला नाही, ते यंदाही २६ टक्केच आहेत. पीआरएसच्या रिपोर्टनुसार पहिल्यांदा आमदार निवडल्या गेलेल्या सदस्यांमध्ये ६१ टक्क्यांनी राजकारण किंवा समाजसेवेलाच आपलं प्रोफेशन सांगितलं आहे. मागील विधानसभेत हे प्रमाण ६७ टक्के होते.

BJP AAP And Delhi Vidhansabha
Manoharlal Khattar on Arvind Kejariwal: आम आदमी पार्टीला महागात पडलं केजरीवालंचं 'ते' विधान; मनोहरलाल खट्टरांनी केला दावा!

मागील विधानसभेत बिझनेस प्रोफेशन सांगणारे केवळ २९ टक्के आमदार होते. मात्र यंदा या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. आठव्या विधानसभेत ४९ टक्के आमदारांनी आपलं प्रोफेशन बिझनेस सांगितलं आहे.

रिपोर्टमध्ये आमदारांचे सरासरी वय ५२ सांगितलं आहे. यानुसार १३ टक्के नवीन आमदारांचे वय २५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. दर मागील वेळी ते २३ टक्के होते. तर ४१ ते ५५ वर्षांच्या आमदारांची संख्या बदलेली नाही. यंदा ४१ ते ५५ वयाचे ४९ टक्के आमदार आहेत. तर ५६ ते ७० वयाचे ३४ टक्के आमदार आहेत. तेच ४ टक्के आमदारांचे वय ७० पेक्षाही जास्त आहे. मागील विधानसभेत ५६ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आमदारांची संख्या २८ टक्के होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com