भोपाळ : मध्यप्रदेशातील भाजप नेते राजकुमार सिंह धनौरा यांची पक्षाने हकालपट्टी केल्यावर ते परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. धनौरा यांनी म्हणाले, आपण गेल्या ३० वर्षांपासून भाजपसाठी काम करत आहे. मात्र, पक्षाने मला किडा-मुंगीप्रमाणे बाजूला केलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, धनौरा यांनी सुरखी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक उमेदवाराच्या मागणीबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये महसूल मंत्री गोविंद राजपूत यांच्याविरोधात ती होती. यामुळे त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. (BJP Madhya Pradesh Latest News)
भाजपमधून हकालपट्टी केल्यावर धनौरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून यामध्ये आपलं म्हणनं मांडल आहे. ते म्हणाले की, मी संघटनेसमोर माझ मत मांडलं आहे. शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. शर्मा यांचीही भेट घेतली आहे. माझी जर काही चूक झाली असेल तर मी पक्षाची माफी मागतो. मात्र माझ्यावर हा अन्याय झाला आहे.
ज्या पक्षासाठी मी ३० वर्षे काम केलं मेहनत केली. मात्र मला एका मिनिटात किड्या-मुंगीसारखं बाजूला केलं आहे. हे सांगतांना ते भावूक झाले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, धनौरा यांनी भाजप जिल्हा मंत्री, युवा मोर्चा, मागासवर्गीय आदी संघटनांमध्ये विविध पदे भूषवली आहेत.धनौरा यांनी मंत्री गोविंद राजपूत यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच मूळ भाजप कार्यकर्त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला होता.
तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळ भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) आलेल्या नेत्यांना पदे मिळाली. त्यामुळे सुरखी येथील जुन्या भाजप नेत्यांची अवस्था पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांकांसारखी झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.