रशियन सैन्याला फुटला घाम; जगातला बेस्ट स्नायपर उतरला युध्दात

रशियाचा युक्रेनवरील हल्ला अठराव्या दिवशीही सुरूच आहे. काही शहरांवर कब्जा करत रशियानं युक्रेनला ताब्यात घेण्यासाठी आता कंबर कसली आहे.
Worlds best sniper joins Ukrainin force against Russia
Worlds best sniper joins Ukrainin force against RussiaSarkarnama

कीव : रशियाचा युक्रेनवरील हल्ला (Russia Ukraine War) अठराव्या दिवशीही सुरूच आहे. काही शहरांवर कब्जा करत रशियानं युक्रेनला ताब्यात घेण्यासाठी आता कंबर कसली आहे. पण या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी युक्रेनच्या बाजूने उभं राहत रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. आता रशियन सैन्याला घाम फोडणारी बातमी युध्दभूमीतून आली आहे. जगातील सर्वात बेस्ट स्नायपर (Sniper) युक्रेनच्या बाजूने युध्दात उतरला आहे.

'वली' (Wali) असं या स्नायपरचं नाव आहे. वली हा फ्रेंच-कॅनडियन कॉम्प्युटर सायंटिस्ट असला तरी लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात त्याचा हातखंडा आहे. तो कॅनडाच्या जॉईंट टास्क फोर्स युनिटचा जवान आहे. या युनिटच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. जगातील नावाजलेल्या स्नायपरपैकी तो एक आहे. जवळपास तीन किलोमीटर अंतरावरूनही तो अचूक वेध घेऊ शकतो. एका दिवसांत तो जवळपास 40 जणांना टिपू शकतो.

Worlds best sniper joins Ukrainin force against Russia
फडणवीसांच्या नोटिसीवरुन अजितदादा उद्विग्न; राजकीय नेत्यांना कानपिचक्या

अफगाणिस्तानसह अन्य देशांमध्येही त्यांनी विशेष मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. 2009 ते 2011 या कालावधीत त्याने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आता तो युक्रेनमध्ये दाखल झाल्याने रशियन सैन्याचे धाबे दणाणले आहेत. मागील आठड्यातच त्याने युध्दभूमीत पाऊल ठेवल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodimir Zelenskyy) यांनी युक्रेनमधील नागरिकांसह अन्य देशांतील सैन्यालाही युध्दात युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

झेलेन्स्की यांच्या आवाहनानंतर वली हा युक्रेनमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत त्यांनी वर्ल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, युक्रेममधील लोकांना मदत करण्यासाठी मी आलो आहे. खूप चांगले वाटत आहे. रशियाकडून निरपराध लोकांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपर्यंत मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त होतो. आता हाता बंदूक घेऊन युध्दात उतरलो आहे. हे माझ्या पत्नी आवडले नव्हते. पण तीही कठोर निर्णय घेत मी युक्रेनमध्ये आलो, असे वलीने सांगितले.

स्नायपर म्हणजे कोण?

स्नायपर म्हणजे दूर अंतरावरून एखाद्या व्यक्तीचा बंदुकीच्या गोळीने वेध घेणारा. पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या अशा स्नायपर्सच्या अनेक शौर्य कथा सांगितल्या जातात. त्यावर अनेक चित्रपटही आले आहे. युध्दामध्ये या स्नायपर्सला खूप महत्व असते. अमेरिकेसह विविध देशांकडून अन्य देशांमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमांमध्ये स्नायपर्सचा वापर करण्यात आला आहे. कारण दूरवरून शत्रुचा अचूक वेध घेण्यात त्यांचा हातखंडा असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com