Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा पुन्हा सरकारला इशारा; '...तर आशियाई क्रिडा स्पर्धेत..'

Wrestlers Protest on Jantar Mantar : ..तर १६ जून पासून पुन्हा आंदोलन
Wrestlers Protest : Sakshi Malik : Vinesh Phogat
Wrestlers Protest : Sakshi Malik : Vinesh PhogatSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मागील अनेक दिवसांपासून देशासाठी पदक मिळवलेल्या कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. आता या कुस्तीपटूंनी सरकारला अशारा दिला आहे. जो पर्यंत कुस्तीपटूंचे प्रश्न सुटत नाही, तो पर्यंत आशियाई खेळात सहभाग घेणार नाही, असा निर्णय साक्षी मलिक हिने घेतला आहे. भाजपच खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला कुस्तीपटू यांनी केला होता. सिंह यांना अटकेची मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी केली आहे. (Wrestlers Protest on Jantar Mantar)

Wrestlers Protest : Sakshi Malik : Vinesh Phogat
Shivsena News : 'त्या' दोन्ही महिला नेत्यांची शिवसेना शिंदे गटातून हाकालपट्टी ! ; पक्षाची शिस्त मोडल्याने..

'...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही' :

साक्षी मलिकने हिने म्हंटलं आहे की, ती, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह अजून दोन कुस्ती खेळाडूंच्या मागण्या पुर्ण झाल्या तरच सर्व कुस्तीपटू हे आशिय़ाई खेळामध्ये सहभाग नोंदवतील. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातीली ही लढाई कायम सुरुच राहील." या सर्व आंदोलक खेळाडूंनी शेतकरी, खाप आणि कर्मचारी याच्या संयुक्त बैठकीत त्यांना सांगितलं की. आमचे सर्व प्रश्नांचं निराकरण झालं तरच आम्ही सर्व आशियाई खेळ स्पर्धेत सहभागी होऊ.

23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर आशियाई क्रीडा स्पर्धा :

पुढील काळात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये यांचं आयोजन होणार आहे. हांगझोऊ या शहराच या स्पर्धेचे आयोजन होणार असून, 30 जूनपूर्वी संघ निवड करता येईल. मात्र या आधीच सरकारने हे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे.

Wrestlers Protest : Sakshi Malik : Vinesh Phogat
Maharashtra politics : गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरुन काढणार ? खडसेंनी सांगितलं कारण , 'जलजीवन मिशन योजनेत..'

तूर्त आंदोलन स्थगित :

आंदोलक कुस्तीपटूंनी सद्या तरी हे आंदोलन स्थगित केलं आहे. मोदी सरकारमधील केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटू यांच्यासोबत दीर्घ चर्चा केली होती. कुस्तीपटूसोबतच्या तब्बल सात तास ठाकूर यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर कुस्तीपटू खेळाडूंना त्यांना योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले आहे. १५ जूनपर्यंत चौकशी करून आरोपपत्र दाखल करण्यात येणार, असा विश्वास ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या नंतरच आंदोलन स्थगित करणयाचा निर्णय घेण्यात आला होता.

तर पुन्हा आंदोलन करणार..

ब्रिजभूषण सिंह यांना 15 जूनपर्यंत अटक न झाल्यास, १६ तारखेपासून पुन्हा आंदोलन करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे कुस्तीपटूंनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com