नवी दिल्ली : लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी आक्रमक झाले. आम्हाला मारा, गाडून टाका...याची भीती वाटत नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आम्हाला अनेक वर्षांपासून याचे ट्रेनिंग मिळाले आहे, असं सांगितले.
राहुल गांधी यांनी लखीमपूर खीरी येथे जाऊन मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेण्याची घोषणा केली आहे. लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पण आपण दोन मुख्यमंत्र्यांसह तिथे जाणार असल्यानं कलम 144 चा प्रश्नच येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने शेतकऱ्यांवर हल्ला केला जात आहे. शेतकऱ्यांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. जे बोलत आहेत, त्यांचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी दुपारी उत्तर प्रदेशाला जाणार आहेत. घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. पण त्यांना याठिकाणी येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर राहुल गांधी हे तिथे जाण्यावर ठाम आहेत. त्यांचा हा प्लॅन उधळून लखनऊ विमानतळावरून उधळून लावण्याचे नियोजन उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात 144 कलम का लावले, असा सवाल करत राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल उत्तर प्रदेशात होते. पण ते लखीमपूर खीरी येथ गेले नाहीत. आज माझ्यासोबत छत्तीसगड व पंजाबचे मुख्यमंत्री लखीमपूर खीरी येथे येणार आहेत. आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केल्यानं लखनऊमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पोलिसांनी त्यांना लखनऊ विमानतळावरच रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विमानतळावर नियोजन केलं आहे. याविषयी माहिती देताना लखनऊचे पोलिस आयुक्त डी. के. ठाकूर म्हणाले, सरकारने राहुल गांधी यांना परवानगी नाकारली आहे. ते लखनऊमध्ये आल्यास त्यांना विमानतळावर विनंती केली जाईल. लखीमपूर खीरी आणि सीतापूर येथे जाण्यापासून त्यांना रोखले जाईल. लखीमपूर व सीतापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी राहुल गांधी यांना थांबवण्याची विनंती आम्हाला केली आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.