स्मृती इराणींच्या मुलीच्या कथित रेस्टॉरंटचे वास्तव? 'बार'वरील काळी पट्टी काँग्रेसने हटविली

Smriti Irani | Goa | Congress | BJP | मंत्री महोदय यांनी टेप लावून 'तुलसी संस्कारी बार' ला लपवले होते
Union Minister Smriti Irani Latest Marathi News, Smriti Irani | Goa | Congress | BJP
Union Minister Smriti Irani Latest Marathi News, Smriti Irani | Goa | Congress | BJP Sarkarnama
Published on
Updated on

Smriti Irani | Goa | Congress | BJP |

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीच्या कथित रेस्टॉरंटचा वाद चांगलाच गाजला आहे. काँग्रेसने स्मृती इराणी यांची मुलगी झोएश इराणी या गोवा (Goa) येथे रेस्टॉरंट व बार चालवत आहेत, मात्र त्याचा परवाना पूर्णपणे अवैध असून तो एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याचा खळबळजनक आरोप करत काँग्रेसने (Congress) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इराणी यांनी मात्र या सर्व आरोपांचा इन्कार करत माझी १८ वर्षांची मुलगी सध्या शिक्षण घेत असून तिचा या रेस्टॉरंटशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

याशिवाय आता इराणी यांनी आज काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या १८ वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घेण्यात येण्याची मागणी केली आहे. दरम्यान या नोटीसीनंतर काँग्रेसने लगेच दोन व्हिडीओ प्रसिद्ध करुन इराणी यांच्या कथित रेस्टॉरंटचे वास्तव समोर आणल्याचा दावा केला आहे.

भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने पहिला व्हिडीओ ट्विट करण्यात आण असून यात स्मृती इराणी यांची मुलगी झोएश इराणी दिसून येत असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीचा छोट्या भागाचा हा व्हिडीओ असून यात झोएश इराणी शेफच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत. तसेच संबंधित मुलाखतकार झोएश यांची ओळख एक तरुण उद्योजक म्हणून करुन देत असून त्यांना गोव्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय हॉटेल सुरु करण्याबाबत प्रश्न विचारत असल्याचेही दिसत आहे.

यानंतर दुसरा व्हिडीओ युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्या ट्विटरवरुन ट्विट करण्यात आला असून त्यात काही काँग्रेसचे कार्यकर्ते एका रेस्टॉंरंटच्या बोर्डवरील 'बा'र या शब्दावर लावण्यात आलेली काळी पट्टी काढताना दिसत आहे. या ट्विटला श्रीनिवास बीव्ही यांनी मंत्री महोदय यांनी टेप लावून 'तुलसी संस्कारी बार' ला लपवले होते असा दावा केला आहे. सोबतच युवा कॉंग्रेसच्या तरुणांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये टेप काढून बारचे वास्तव समोर आणले असे म्हटले आहे.

आरोप-प्रत्यारोप

दरम्यान या प्रकरणावर कालपासून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून स्मृती इराणी यांच्या मुलीच्या गोवा येथील बारचा परवाना बनावट व खोटा आहे. असा बोगस परवाना केवळ इराणी यांची मुलगी असल्यानेच दिला गेला का याचा तपास करण्याची कॉंग्रेसने मागणी केली आहे. या प्रकरणी गोव्यातील बारला नोटीस पाठविणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांचीही उचलबांगडी करण्याच्या हालचाली असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसने केला आहे. हे प्रकरण बाहेर काढणाऱ्या आरटीआय कार्यकर्ता रॉड्रिग्ज यांच्या जीवाला भाजपच्या प्रमोद सावंत सरकारकडून धोका असल्याची भीती कॉंग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी बोलून दाखविली आहे.

शिवाय भाजप केवळ आरोप करते व आम्ही कागदपत्रांसह बोलत आहोत. गोव्यातील बोगस परवाना घेऊन काढलेला हा बार स्मृती इराणी यांच्या मुलीचाच आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी इराणी यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही रमेश यांनी केली. हे प्रकरण आम्ही संसदेतही उपस्थित करणार असा निर्धार रमेश यांनी व्यक्त केला.

या आरोपांना आणि मागणीला प्रत्युत्त देताना इराणी यांनी आपल्या मुलीवरील आरोप फेटाळले आहेत. गोव्यात ज्या बारबद्दल कॉंग्रेस आरोप करत आहे त्याच्याशी आपल्या मुलीचा कागदोपत्री काहीही संबंध नाही असाही दावा इराणी यांनी केला. तसेच या प्रकरणात त्यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या १८ वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली असून कॉंग्रेस नेत्यांनी लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com