H. D. Kumaraswamy: सिद्धरामय्यांच्या कॅबिनेट मंत्र्याने 'कालिया कुमारस्वामी' म्हणत निर्माण केला नवा वाद!

Zameer Ahmed statement on Kumaraswamy: मग 'जेडीएस'नेही थेट खर्गेंचा उल्लेख करत काँग्रेसला केला सवाल; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
Zameer Ahmed | H. D. Kumaraswamy
Zameer Ahmed | H. D. KumaraswamySarakarnama
Published on
Updated on

Karnataka News: काँग्रेस नेते आणि कर्नाटकाती मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीयमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर वांशिक टिप्पणी करून वाद निर्माण केला आहे. त्यांनी एका सभेला संबोधित करताना कुमारस्वामींना 'कालिया कुमारस्वामी' म्हटले होते. ज्यानंतर आता जेडीएसने पलटवार केला आहे. जेडीएसने म्हटले की जमीर अहमद यांनी चन्नपटण पोटनिवडणुकी दरम्यान केंद्रीयमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासाठी वांशिक अपशब्द वापरले.

कर्नाटक सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, कालिया कुमारस्वामी भाजपपेक्षाही जास्त खतरनाक आहेत. तेच जेडीएसने यास वांशिक टिप्पणी संबोधत काँग्रेसला प्रतिसवाल केला की, पक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनाही हेच म्हणणार का? कारण तेही कन्निडग आहेत.

कुमारस्वामीची (Kumaraswamy) पार्टी जेडीएसने मंत्री जमीर अहमद यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आणि सोशल माडिया एक्सवर पोस्ट करत म्हटले की मंत्री जमीर अहमद यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान वांशिक अपशब्द वापरले. केंद्रीयमंत्री एचडी कुमारस्वामींनी त्यांनी कालिया कुमारस्वामी म्हणून अपमानित केलं. असं म्हणून त्यांनी काळ्या वर्णाच्या लोकांचा अपमान केला आहे आणि वांशिक भेदभाव केला आहे. त्यांच्या तोंडून निघलालेली ही वांशिक भेदभाव करणारी टिप्पणी क्षमा करणे योग्य नाही. राज्यातील जनता तुमच्या अपमानास्पद शब्दांचा आणि काळ्या वर्णाच्या लोकांबाबतच्या तुमच्या नकारात्मक मानसिकेतचं योग्य उत्तर देतील. याचबरोबर काँग्रेसमंत्री जमीर अहमद यांना बडतर्फ करण्याची मागणी केली गेली आहे.

Zameer Ahmed | H. D. Kumaraswamy
Delhi Politics: दिल्लीत निवडणुकीआधीच आम आदमी पार्टीला भाजपकडून मोठा धक्का!

याशिवाय केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी वांशिक टिप्पणीची निंदा करत म्हटले की, मी काँग्रेस मंत्री जमीर अहमद यांनी मंत्री व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना कालिया कुमारस्वामी म्हटल्याचा मी तीव्र निषेध करतो. ही एक वांशिक टिप्पणी आहे, बरोबर तशीच जशी राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी दक्षिण भारतीयांना आफ्रिकीन, ईशान्येकडील लोकांना चिनी आणि उत्तर भारतीयांना अरबी सारखे संबोधले होते.

Zameer Ahmed | H. D. Kumaraswamy
Prajwal Revanna Sex Scandal : सुप्रीम कोर्टाकडून प्रज्वल रेवण्णाला दणका; निवडणुकीत विरोधकांकडूनही होतेय टीका

जमीर अहमद हे काँग्रेस नेतृत्वातील सिद्धरामय्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते चामराजपेट मतदारसंघातून पाचवेळा आमदार झालेले आहेत आणि अल्पसंख्याक प्रकरणांच्या महत्त्वपूर्ण विभागाचे प्रभारी देखील आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com