गणेश नाईक यांच्या  भाजप प्रवेशाची तारीख पे तारीख 

ganesh_naik
ganesh_naik

भाजपचे राष्ट्रीय अमित शाहा महाराष्ट्र भेटीवर आल्यानंतर भाजप पक्षसंघटना गतीमान झाल्याचे पक्षांतर्गत घडामोडी गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.


महाराष्ट्र विधानसभेत असणार्‍या 288 जागांपैकी किमान 200 जागांवर भाजपचे आमदारनिवडून आणण्यासाठी भाजप पक्षसंघटनेने आतापासूनच कंबर कसली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास व मोर्चेबांधणी सुरू आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक
हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेत. 


नवी मुंबईत ऐरोली व बेलापुर असे विधानसभा मतदारसंघ मोडतात. त्यामध्ये बेलापुर मतदारसंघात भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे आहेत तर ऐरोलीत राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार संदीप गणेश नाईक हे आहेत. विधानसभा निवडणूकीत मोदी लाट असल्यामुळेच मंदा म्हात्रे भाजपच्या तिकिटावर 1200 मतांनी विजयी झाल्या.  परंतु भाजपला मिळालेले मतदान हा मोदी लाटेचाच परिणाम असल्याचे अवघ्या पाच महिन्यानी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत स्पष्ट
झाले. 

महापालिका निवडणूकीत भाजपचे अवघे 6 नगरसेवक निवडून आले. त्यातील  वाशीतील संपत शेवाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक होते. त्याजागेवर त्यांच्या पत्नी दमयंती शेवाळे निवडून आल्या. घणसोलीत उषा कृष्णा पाटील निवडून आल्या असल्या तरी कृष्णा पाटील हे मुळचे मनसेचे पदाधिकारी होते. माथाडी वसाहतीत त्यांना जनाधार होता.

नेरूळमधील सुनील पाटील हे भाजपचे नगरसेवक बनले तरी पूर्वी ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होती. त्यांच्या पत्नी सरस्वती पाटील या नगरसेविका होत्या. भाजपचे फक्त 6 नगरसेवक निवडून आले. त्यात जे आले ते स्वत: स्थानिक भागात मातब्बर होते. मोदी लाट ओसरली आणि महापालिका निवडणूकीत स्थानिक पातळीवर बेलापुरमध्ये भाजपचा आमदार असतानाही भाजप तोंडघशी पडली.


गणेश नाईक व त्यांचा परिवार आणि त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय क्षेत्रात उधाण आले आहे. या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.  नाईकभाजपमध्ये आल्यास भाजप व नाईकांनाही फायदाच आहे. भविष्यात लोकसभा निवडणूका
शिवसेना व भाजप स्वबळावरच लढण्याची दाट शक्यता आहे.

संजीव नाईकांच्या माध्यमातून ठाणे लोकसभेकरिता भाजपलाही तगडा उमेदवार मिळेल आणि संजीव
नाईकांनाही भाजपमुळे पुन्हा एकवार लोकसभेत प्रवेश करता येईल. आमदार संदीप नाईकांमुळे भाजपला ऐरोली विधानसभा मतदारसंघावर प्रभाव निर्माण करता येईल. मोदी लाट असतानाही संदीप नाईकांनी साडे सात  हजाराच्या मताधिक्याने ऐरोलीचा आपला गड राखला होता.

गणेश नाईक हे बेलापुर विधानसभा लढण्याची शक्यता असल्याने विद्यमान आमदार मंदा म्हात्रेंचा प्रश्‍न भाजपपुढे आहेच. मंदा म्हात्रेंचे विधान परिषदेवर पुर्नवसन करण्याची शक्यता भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून
व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या प्रभावाखाली येणे शक्य होणार आहे. ऐरोली विधानसभा व नवी मुंबई महापालिका यावर प्रभाव निर्माण
करण्यासाठी भाजपाला नाईकांच्या प्रवेशाविषयी घाईच असल्याचे अंर्तगत घडामोडींवरून पहावयास मिळत आहे.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com