तुरीच्या भरडाईमध्ये 2 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करीत  धनंजय मुंडेंनी सभागृहात तूर आणली 

तुरीपासून डाळ बनविण्याचे काम स्वत:च्या मर्जीतील सप्तशृंगी कंपनीला देण्यासाठी 2 वेळा निविदा काढण्यात आल्या. दाळ बनविण्याची कोणतीही यंत्रणा नसताना त्यांच्यासाठी निविदेच्या अटीत वारंवार बदल केले, भरडाईसाठी दररोज 2 हजार मेट्रिक टन क्षमता आवश्यक असताना केवळ 50 मेट्रिक टन प्रतिदिन भरडाईची अट टाकल्यामुळेच आज गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन दाळ पडून . या प्रक्रियेत फेडरेशनने घेतलेल्या 1400 कोटी रुपयांवर व्याज द्यावे लागत आहे, सप्तश्रुंगीचा दाळ बनविण्याच्या प्रक्रियेतील कमी उतारा मान्य करुन 508 कोटी रुपयांचा तोटा .
munde-deshmukh
munde-deshmukh

मुंबई :  आपल्या मर्जीतील कंपनीला तुरीपासून डाळ बनविण्याचा ठेका देऊन राज्य सरकारने यामध्ये दोन हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिषदेत केला. या घोटाळ्याच्या गंगेत  मंत्र्यांसोबत विभागातील अधिका-यांनी हात  कसे धुवून घेतले याचा पाढाच मुंडे यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलत असताना वाचून दाखवला. 

विशेष म्हणजे या सर्व घोटाळ्याची कागदपत्रेच आपण आज घेऊन आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुंडे म्हणाले, राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत, खरेदी केंद्रांवर तुरीचे माप होत नाही, तूर विक्रीला नंबर लागत नाही, नंबर लागला तर महिनोन-महिने पैसे मिळत नाहीत, तूर ठेवायला गोदामात जागा नाही, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. लाखे  नावाच्या एका शेतकऱ्याचा खरेदी केंद्रावर मृत्यू देखील झाला आहे. तरीदेखील निगरगट्ट  सरकार मढ्यावरचे लोणी खात असल्याचे चित्र पहायला मिळत असलाचाही आरोप मुंड़े यांनी केला.  

मागील वर्षी खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याचे काम स्वत:च्या मर्जीतील सप्तशृंगी कंपनीला देण्यासाठी 2 वेळा निविदा काढण्यात आल्या.  दाळ बनविण्याची कोणतीही यंत्रणा नसताना त्यांच्यासाठी निविदेच्या अटीत वारंवार बदल केले, भरडाईसाठी दररोज 2 हजार मेट्रिक टन क्षमता आवश्यक असताना  केवळ 50 मेट्रिक टन प्रतिदिन भरडाईची अट टाकल्यामुळेच आज गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन दाळ पडून असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रक्रियेत फेडरेशनने घेतलेल्या 1400 कोटी रुपयांवर व्याज द्यावे लागत आहे, सप्तश्रुंगीचा दाळ बनविण्याच्या प्रक्रियेतील कमी उतारा मान्य करुन 508 कोटी  रुपयांचा तोटा सहन केल्याचा आरोप त्यांनी केला. 

 

 पणन मंत्र्यांच्या तोंडी आदेशावरुन हा निविदा प्रक्रियेत बदल करण्यात आल्याचे सांगताना या संबंधातील मूळ फाईलमधील कागदपत्रेही त्यांनी वाचून दाखविली.  सप्तश्रुंगी कंपनीमार्फत तयार केली जाणारी दाळ निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत त्यांनी या कंपनीने तयार केलेली व बाजारातील उपलब्ध दाळींची पाकिटे सभागृहात सादर करुन सर्वांनाच अवाक केले.

 या प्रकरणात मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक अनिल देशमुख हेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, या संपूर्ण प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com