langna
langna

लग्नसमारंभात फळरोपे देवून दिला पर्यावरण संदेश..

लग्नसमारंभ म्हटले की हार- तुरे,भाषणे अन् रटाळ वाटनारा लांबलचक स्वागत समारंभ लग्नकार्यात पहायला मिळतो किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांचे बंधू भरत यांचा लग्नसमारंभ देऊळगांव राजा येथील दिनदयाळ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता जायभाये व मुंढे ह्या प्रतिष्ठित घराण्यातील ह्या लग्नात ही अनिष्ट प्रथांची परिचिती उपस्थितांना अपेक्षित असतांना निवेदकाने एका महत्वाच्या सुचनेकडे लक्ष वेधले. ह्या लग्न सोहळ्यात फळ रोपे भेट स्वरुपात वितरीत करण्यात आली.

देऊळगांव राजा : समाजात रूढ़ झालेल्या चाली रीती सह विविध अनिष्ट, खर्चिक बाबी लग्न समारंभात प्रचलीत झाल्या असताना किनगाव राजा येथील जायभाये कुटुंबाने लग्नसमारंभात उपस्थित मान्यवारांना फळरोपे भेट देऊन समाजा पुढे पर्यावरण जागृती चा संदेश दिला आहे.  

लग्नसमारंभ म्हटले की हार- तुरे,भाषणे अन् रटाळ वाटनारा लांबलचक स्वागत समारंभ लग्नकार्यात पहायला मिळतो किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांचे बंधू भरत यांचा लग्नसमारंभ देऊळगांव राजा येथील दिनदयाळ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता जायभाये व मुंढे ह्या प्रतिष्ठित घराण्यातील ह्या लग्नात ही अनिष्ट प्रथांची परिचिती उपस्थितांना अपेक्षित असतांना निवेदकाने एका महत्वाच्या सुचनेकडे लक्ष वेधले. ह्या लग्न सोहळ्यात फळ रोपे भेट स्वरुपात वितरीत करण्यात आली व  पर्यावरणच्या दृष्टीने सर्वानी सदर वृक्ष लागवड व् संवर्धन करण्याची कळकळीची विनंती करण्यात आली.

लोकनेता प्रतिष्ठान च्या माध्यमाने सामाजिक कार्यात अग्रेसर जायभाये कुटुंबा तर्फे  प्राथनिधिक स्वरुपात चिक्कु ची ५० फळरोपे वितरण करण्यात आली. तर उर्वरित ५०० रोपे स्व.लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त येत्या ३ जून ते २१ जून पर्यावरण सप्ताहा दरम्यान सावखेड ते सवखेड फाटा रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिवानंद जायभाये यांनी दिली.

आज आपल्या राज्यात आपण सर्व पाणीटंचाई व भीषण दुष्काळाचा सामना करत आहोत. ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे, या गोष्टीचा जायभाये परिवाराने सकारात्मक विचार करुन भावाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना हार तुरे न देता वृक्षाचे महत्व वाढावे आणि लोकांनी वृक्षा रोपण करावे; यासाठी आलेल्या पाहुण्यांना चिकूची कलम भेट देऊनएक वेगळा संदेश दिला.

प्रातिनिधीक स्वरुपात 50 वृक्ष कलम देऊन आलेल्या मान्यवर पाहुन्यांचे स्वागत करण्यात आले. येत्या जून महिन्यात पर्यावरण सप्ताहात सावखेड फाटा ते सावखेड़ गावा पर्यन्त रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार अशी माहिती डॉ. शिवानंद जायभाये यांनी उपस्थितांसमोर दिली.

खरे तर असाच संदेश घेऊन लोकांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न अशा समारंभातुन केला तर भविष्यात जल संकटासह भीषण दुष्काळी परिस्थितिला तोंड देण्याची वेळ येणार नाही लग्न समारंभात वृक्ष रोपनाचे महत्व व् रोपे वितरण करुन पर्यावरण जागृती संदर्भात जन जागृती करण्याचा संदेश एक प्रकारे देण्यात आला असुन लग्नसोहळ्यातील आलेल्या प्रत्तेक आप्त स्वकीय,मित्र परिवार यांनी डॉ.शिवानंद जायभाये आणि परिवाराचे कौतुक करुन वर आणि वधु यांना शुभ आशीर्वाद दिले.                       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com