मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाची रवींद्र चव्हाण ,कपिल पाटील यांनी केली अंमलबजावणी 

सेनेलाही लाभदरम्यान गिल्बर्ट मेन्डोन्सा हे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस सांडून गेल्याने या पक्षाच्या जागा शुन्यावर आल्या आहेत.शिवसेनेत दाखल झालेल्या मेन्डोन्सानी नेमके काय केले हे तपासण्यास निकालांचा तपशील पहावा लागेल असे सेनेने नमूद केले.मात्र शिवसेनेच्या जागातही 15 वरून 22 ची वाढ झाली आहे.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिछेहाटीचा भाजपबरोबरच शिवसेनेलाही लाभ होतो हे निकालांनी स्पष्ट केले आहे.भाजपने जागा दुपटीने वाढवल्या असताना शिवसेनेच्या वाढलेल्या जागा अगदीच किरकोळ असल्या तरी अमराठी भागातही सेनेने आपली मते वाढवली आहेत.
chavan-patil-
chavan-patil-

मुंबई : मीरा भाईंदर येथे स्पष्ट बहुमत मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने 10 व्या महानगरपालिकेवर झेंडा फडकावला आहे. एमएमआरपरिसरातील पाचही महापालिकात भाजप वजीर असल्याचेही या निकालांनी स्पष्ट केले.

2012 साली भाजपने जिंकलेल्या 32 वरून तब्बल 61 वर गेली आहे.मुंबईच्या लगत वसलेल्या या सॅटेलाईटसारख्या शहरातील अमराठी वस्तीत योग्य ती व्यूहरचना करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय खेचून आणला असे मानले जाते .

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सूर्या धरणाला 250 कोटींची मदत ,मेट्रो थेट भाईंदरपर्यंत नेण्याचे आश्‍वासन हा या यशाचा मंत्र असल्याचे मानले जाते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची व्यूहरचना अत्यंत अचूकपणे राबवल्याने जागा दुप्पट झाल्या.विलासी जीवनशैलीसाठी प्रसिध्द झालेल्या नरेंद्र महेता यांनी या सर्व प्रयत्नात मोलाची भूमिका बजावल्याचे  दिसते . 

मीराभाईंदरच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास आणि विश्‍वास या घोषणांना मतदान केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली आहे.तसेच मीराभाईंदरसाठी घोषित केलेल्या योजना अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आणण्याचे आश्‍वासनही दिले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत मोलाची भुमिका बजावणाऱ्या खासदार कपिल पाटील यांना या निवडणुकीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत मोलीची साथ दिली.डोंबिवली परिसरातील चव्हाण यांना राज्यमंत्री करून फडणवस यांनी त्यांच्यावर मुंबई भोवतालच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली होती.ती पार पाडण्यात चव्हाण पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मात्र निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.मुंबईत दमछाक,पालघर कल्याण डोंबिवलीत अडले ,पनवेलमध्ये भोपळा असे टवीट करत एमएमआरमध्ये पाचव्यांदा काहींच्या ताकदीचा असली चेहरा समोर आल्याचा टोमणाही त्यांनी मारला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com