समृद्धी महामार्गावर असणार 31 टोलनाके ,भरावा लागेल तब्बल १५०० रुपये टोल !

आगामी काळात समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तयार झाला तरी त्यावरून मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे दिड ते दोन हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.
Samrudhi-tolls
Samrudhi-tolls

मुंबई  : राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील टोल वसुलीला प्रवासी कंटाळली असतानाच राज्यसरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरही टोलधाड पडणार आहे. या महामार्गावर एकूण 31 टिकाणी टोलनाके उभारण्यात येणार असल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. 

विधानसभा निवडणूकीपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या मुंबई- नागपूर या समृध्दी महामार्गावर तब्बल 31 टोल नाके प्रस्तावित आहेत, अशी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहिती अधिकारामध्ये समोर आली आहे. 

शिवसेना भाजप सरकारने मुंबई -नागपूर या समृध्दी महामार्गाची घोषणा केल्यानंतर अनेक कारणांनी हा महामार्ग वादात सापडला आहे. तब्बल 47 हजार कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या महामार्गाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. 

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे महामार्गासाठी आवश्‍यक असलेल्या जमीनीचे संपादन रखडले असताना टोल आकारणीमुळे या प्रकल्पाला पुन्हा विरोध होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नव्याने होत असलेल्या मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोल नाके उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते व टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमुळे उजेडात आली आहे. 

आगामी काळात समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तयार झाला तरी त्यावरून मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे दिड ते दोन हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. मुंबई ते नागपूर असा जवळपास 700 किलो मीटरचा समृद्धी महामार्ग होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचा स्वप्नातील प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जात आहे. 

 हा प्रकलाप पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा करण्यात आल्यानंतर या महामार्गावरील असलेल्या टोलनाक्‍यांची माहिती जाहिर करण्यात आली नव्हती मात्र या उघड झालेल्या माहितीमुळे विरोध वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com