राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे अपघातातून बचावल्यानंतर 40 दिवसांनी प्रथमच परळीत आले.
परळीत कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढून धनंजय मुंडेंचं स्वागत केलं.
मुंडे 40 दिवसांनंतर मुंबईहून परळीत परत येणार हे माहित असल्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी समर्थकांकडून करण्यात आली होती.
डीजे, विद्युतरोषणाई आणि पंचवीस जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
मागील दोन वर्षात धनंजय मुंडेंवर अनेक संकट कोसळली. यावेळी शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिलं. 'कुच लोग मेरे बारेमे बोल रहे है, मैने कभी पिठ पीछे से वार नहीं किये.. लढेंगे तो सामने..वक्त ने थोडासा साथ नही दिया तो लोगोने मेरी काबिलियत पर शक कर दिया,'
मुंडेच्या वेलकमची राज्यभर चर्चा झाली, परंतु कार्यक्रमाला पोलिसांनी दिलेली रात्री दहाची वेळ न पाळल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्या विरोधात परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कार्यक्रमाला पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत परवनागी दिली होती. पण मुंडे यांची मिरवणूक व भाषण रात्री बारानंतरही सुरू होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
परळी वैद्यनाथाच्या कृपेने मला आज पुनर्जन्म मिळाला आहे. त्यामुळे मी श्वास असेपर्यंत परळीच्या जनतेसोबत असेन. या सभेच्या वेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
धनंजय मुंंडेंच्या बॅनरवर क्रेनने एक भला मोठा हार लावण्यात आला होता.