गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५ वर्षापासून त्यांनी आपल्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली. पण भारताची गान कोकीळा बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. गायनाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला होता.
लतादीदी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचा खास स्नेह होता. लतादीदी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानत आणि बाळासाहेब देखील मोठ्या भावाप्रमाणे लतादीदींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहत असायचे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर वडिलांची सावली पुन्हा डोक्यावरून उठल्याचे दु:ख लतादीदींना झाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांचा खास स्नेह होता. लतादीदींची तब्येत बिघडल्याचे कळताच राज ठाकरे तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले होते.
बाळासाहेबांचा माझ्यावर इतका विश्वास होता की, बाळासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच मला याबाबत माहिती दिली होती. 'बाळा साहेबांना मृत्यूच्या खूप आधी त्यांचे शेवटचे दिवस कळले होते'. बाळासाहेब आजारी असताना जेव्हा मी त्यांना भेटायला गेले तेव्हाच बाळासाहेबांनी, माझी वेळ आली आहे, मी काही दिवसातच या जगाचा निरोप घेणार असल्याचे मला सांगितल होते.
बाळासाहेब ठाकरे खूप विनोदी व्यक्ती होते. मी जेव्हाही त्यांना भेटायचे तेव्हा अनेकदा ते माझी चेष्टा करायचे, असेही त्यांनी लता मंगेशकर यांनी सांगितले होते. लता मंगेशकर यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीत बाळासाहेब खूप गंभीर होते. 'मी खूप थकलो आहे आणि आता माझी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे, कदाचित आपण शेवटचं भेटत आहोत, असंही त्यांनी लतादीदींना सांगितलं होतं.
बाळासाहेब ठाकरे यांनी लता मंगेशकर यांचा नेहमीच आदर केला. बाळासाहेब लता मंगेशकर यांना देशाचा तसेच मराठी समाजाचा अभिमान मानत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त लता मंगेशकर सदैव त्यांचे स्मरण करून आदरांजली वाहत असत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.