भारताची (India) गान कोकिळा लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लतादीदींना (Lata Mangeshkar) कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते.
गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५ वर्षापासून त्यांनी आपल्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली. पण भारताची गान कोकीळा बनण्यापर्यंतचा त्यांचा संगीताचा प्रवास इतका सोपा नव्हता. गायनाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला होता.
लता मंगेशकर यांनी स्वत: त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत कशी प्रगती केली याचा उल्लेख केला आहे. कामाची हौस इतकी होती की त्यांना कधीही खाण्यापिण्याचीही पर्वा केली नाही. कधीकधी फक्त चहा किंवा पाणी पिऊनही त्या दिवस काढत असत.
यतींद्र मिश्रा यांच्या 'लता सूर गाथा' या पुस्तकात त्यांच्या संघर्षाच्या दिवसांचा उल्लेख आहे. 'लता सूर गाथा'ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. लता मंगेशकर यांनी पुस्तकात सांगितले होते की, 'रेकॉर्डिंग करताना मला अनेकदा थकवा येत असे आणि मला खूप भूकही लागली होती. त्या वेळी रेकॉर्डिंग स्टुडिओत कॅन्टीन होते, पण खायला काही चांगलं मिळालं, असं कधीही आठवत नाही.
कधीकधी फक्त चहा-बिस्किटे वगैरे मिळत असत आणि एक-दोन कप चहा किंवा दोन-चार अशा बिस्किटांवर पूर्ण दिवस जात असे. अनेकवेळा फक्त पाणी पिण्यातच दिवस गेला आणि कॅन्टीनमध्ये गेल्यावर चहा प्यावा, हे लक्षातच येत नव्हते. माझ्या मनात सतत असायचं की काहीह झालं तरी मला माझ्या कुटुंबाला बघायचं आहे.
मग तो रेकॉर्डिंगचा वेळ असो की घरी मोकळा वेळ. मी माझ्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त पैसे कसे कमवू शकते आणि त्यांच्या गरजा कशा पूर्ण करू शकते. यातच सगळा वेळ जायचा. रेकॉर्डिंग किंवा त्याच्या त्रासाची मला फारशी पर्वा नव्हती. पण उद्या कोणत्या चित्रपटाची आणि किती गाणी मला रेकॉर्ड करायची आहेत, याची जास्त चिंता असायची.
962 च्या चीनसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. देशाला प्रोत्साहन देण्यासाठी 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे तयार करण्यात आले, पण जेव्हा लता मंगेशकर यांना या गाण्याची ऑफर आली तेव्हा त्यांनी प्रथम नकार दिला.
बिझी शेड्युलमुळे लतादीदींंना गाण्यावर विशेष लक्ष देणं शक्य नव्हतं. कवी प्रदीप यांनी त्यांना गाण्यासाठी प्रवृत्त केल्यावर ती आशा भोसले यांच्यासोबत गाण्यास तयार झाल्या. मात्र ऐन कार्यक्रमापूर्वी आशा दीदींना दिल्लीला जाण्यास नकार दिला. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना एकट्याने गाण्याची तयारी करावी लागली.
'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे रचणारे सी. रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची टेप दिली होती, ती ऐकूनच लतादीदींना गाण्याचा रियाज केला. कार्यक्रमासाठी विमानाने दिल्लीला जाताना लताजी रामचंद्रांनी दिलेल्या टेप्स ऐकत राहिल्या. 27 जानेवारी 1963 रोजी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये त्या पोहचल्या आणि ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले.
लता मंगेशकर सांगतात की, गाणे संपवून जेव्हा त्या स्टेजवरून निघाल्या तेव्हा मेहबूब खान आले आणि हात धरून म्हणाले, 'चलो नेहरू जी ने बुलाया है'. पंडितजींना त्यांना का भेटायचे आहे, असा प्रश्न लतादीदींना पडला होता. लताजी स्टेजवर आल्यावर पंडितजींसह सर्वांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. पंडितजींनी गाण्याची स्तुती केली, त्यावेळी डोळेही पाणावले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.