12 मार्च 1993 चा दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. कारण याच दिवशी मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांनी मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरुन गेला होता. आज या घटनेला ३० वर्षे झाली. या स्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला. तर 713 जण गंभीर जखमी झाले. शेकडो लोकांना कामस्वपरुपी अपंगत्व आले.
- पहिला स्फोट 1.30 वाजता झाला
1. दररोज प्रमाणे मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त असताना 12 मार्च 1993 रोजी दुपारी 1.30 वाजता स्टॉक एक्सचेंजच्या 28 मजली इमारतीच्या तळघरात पहिला स्फोट झाला. यात 50 लोकांचा मृत्यू झाला. तिथला आरडाओरडा अजून थांबला नव्हता की अर्ध्या तासातच नरसीनाथ रस्त्यावर आणखी एका कारमध्ये दुसरा स्फोट झाला. पुढील दोन तासांत 12 मालिका स्फोट झाले.
2. या भागात झाले बॉम्बस्फोट
यानंतर बॉम्बस्फोटाची मालिकाच सुरु झाली. स्टॉक एक्सचेंज इमारत आणि नरसीनाथ रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, शिवसेना भवन, एअर इंडिया बिल्डिंग, झवेरी बाजार, वरळीतील एका डबल डेकर बस, त्यानंतर मच्छीमारांची कॉलनी, सी रॉक हॉटेल, प्लाझा सिनेमा, जुहू सेंटॉर हॉटेल, सहार विमानतळ आणि एअर इंडिया ऑफिस अशा १२ ठिकाणी कान सुन्न करणारे बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये शेकडो लांकांनी प्राण गमावले, तर अनेक जण गंभीर झाले.
3. पहिला मालिका बॉम्बस्फोट
जगभरातील मालिका बॉम्बस्फोटांची ही पहिलीच घटना होती. या स्फोटांमध्ये मुंबईचे सुमारे 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम हा आहे. मात्र त्याला आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाही.
4. प्रकरण असेच चालले
घटनेनंतर 4 नोव्हेंबर 1993 रोजी 189 जणांविरुद्ध 10 हजाप पानांचे प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले. 19 नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. एप्रिल 1995 मध्ये मुंबईच्या टाडा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. पुढील दोन महिन्यांत आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.
5. निर्णय येऊ लागले
सप्टेंबर 2006 मध्ये न्यायालयाने या प्रकरणी निकाल देण्यास सुरुवात केली. यात 123 आरोपींपैकी 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तर २० जणांना जन्मठेपेची तर ६८ जणांना त्यापेक्षा कमी शिक्षा सुनावण्यात आली. 23 जण निर्दोष आढळले.
6. अभिनेता संजय दत्त दोषी
नोव्हेंबर 2006 मध्ये अभिनेता संजय दत्त बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि एके-56 रायफल बाळगल्याप्रकरणी दोषी आढळला होता. संजय दत्तला अटक झाली आणि 18 महिने तुरुंगात काढावे लागले.
7. मेमन कुटुंबातील 4 जण दोषी
मुंबई न्यायालयाने बॉम्बस्फोटात दोषी ठरवलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचाही समावेश आहे. याकूब मेमन, युसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांना कट रचणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोष सिद्ध झाले. याकूब मेमनला 30 जुलै 2015 रोजी महाराष्ट्रातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
8. अबू सालेमला अटक
18 सप्टेंबर 2002 रोजी अबू सालेम आणि त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदीला इंटरपोलने लिस्बन, पोर्तुगाल मधून अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2004 मध्ये पोर्तुगालमधील एका न्यायालयाने त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती.
9. सालेमच्या साथीदारावर 8 आरोप
मार्च 2006 मध्ये, विशेष टाडा न्यायालयाने सालेम आणि त्याचा सहकारी रियाझ सिद्दीकी यांच्यावर आठ आरोप दाखल केले. त्याच्यावर शस्त्रास्त्रे वाटल्याचाही आरोप होता. तेव्हापासून अबू सालेमला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात उच्च सुरक्षेत ठेवण्यात आले आहे.
10. न्यायालयात दोष सिद्ध झाले
विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चंट आणि करीमुल्ला खान यांना १६ जून २०१७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या कटासाठी दोषी सिद्ध झाले. पण अब्दुल कय्युमची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.