संघर्षाचे दुसरे नाव; एन.डी. पाटील

शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील (N. D. Patil) यांनी आज (१७ जानेवारी) 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
N. D. Patil
N. D. Patil
Published on

प्रा. एन. डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून ९५५ साली एम.ए. (अर्थशास्त्र) आणि १९६२ साली एल.एल.बी चे शिक्षण घेतले.

- प्रा. एन. डी. पाटील यांचे अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

- प्रा. एन. डी. पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

- प्रा. एन. डी. पाटील यांचे राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

- प्रा. एन. डी. पाटील यांनी भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

- प्रा. एन. डी. पाटील यांचे प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

- रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष

2019 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आली होती. ही नियुक्ती जून २०१९ ते मे २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com