'पारतंत्र्यांची आठवण जपणारी वास्तू आता सशक्त लोकशाहीचा वारसा पाहणार'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे आज (11 फेब्रुवारी) उदघाटन करण्यात आले.
Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan
Published on
Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजीच होणार होते. मात्र सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे हा उदघाटन सोहळ्याला स्थगिती देण्यात आली होती.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

राजभवनातील जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच नवीन दरबार हॉल बांधण्यात आला आहे. नव्या दरबार हॉलची आसन क्षमता 750 इतकी आहे. तर जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

पूर्वीचा दरबार हॉल हा शंभर वर्षांहून अधिक जुना असल्याने अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला होता. त्याच्या जागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवास स्थान होते. ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावलं होतं. अशा अनेक आठवणी आहेत. या संपूर्ण वास्तूचे जुनी वैशिष्ट्ये जपत आपण नवीन वास्तू उभारली आहे, अशी आठवण यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

आधुनिकता अंगी बाळगतांना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली असल्याची भावना यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

Darbar hall in Rajbhavan
Darbar hall in Rajbhavan

मुंबईतील राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत केले. ही नवीन रुप धारण केलेली वास्तु आहे. यात ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी मनापासून आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com