समीर वानखेडेंचा एनसीबीचा कार्यकाळ संपला; अशी होती वानखेडेंची कारकीर्द

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना सप्टेंबरमध्ये 2021 मध्येच चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
Sameer Wankhede

Sameer Wankhede

Published on

Sameer Wankhede

Sameer Wankhede

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ आज संपत आहे. अशी माहिती एनसीबीने दिली आहे. समीर वानखेडे यांना सप्टेंबरमध्ये 2021 मध्येच चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आज (31 डिसेंबर) वानखेडे यांचा कार्यकाळ संपत असून, ते मुदतवाढ मागणार नसल्याचं निवेदन एनसीबीने जारी केले होते.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन अटक प्रकरणातून समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

पण तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे 2008 बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS)अधिकारी आहेत. निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी ज्ञानदेव वानखेडे यांचे ते पुत्र आहेत. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 या काळात त्यांनी एकूण 28 गुन्हे दाखल केले आणि 96 जणांना अटक केली. तर, 2021 मध्ये 117 गुन्हे दाखल करत 234 लोकांना अटक केली. समीर वानखेडे यांनी जवळपास1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले तर 11 कोटीपेंक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

एनसीबी मध्ये काम करण्यापूर्वी समीर वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA)अतिरिक्त एसपी म्हणूही काम केलं. त्यानंतर कस्टम्स विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती असताना कस्टम चुकवणाऱ्या अनेक सेलिब्रेटींना पकडले आणि त्यांच्याकडून दंड वसूल केले.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

त्यानंतर एनसीबीच्या संचालक पदावर असताना ऑगस्ट 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरण त्यांनी स्वत: च्या हाती घेतले. या प्रकरणात त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून, अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची चौकशी केली, तर 33 हून अधिक जणांना अटकही केली. या धडाकेबाज कामगिरी साठी त्यांना 2021 मध्ये उत्कृष्ट कामासाठी 'गृह मंत्री पदका'ने सन्मानित करण्यात आले.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

Sameer Wankhede

Sameer Wankhede

मात्र ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे ते जास्तच चर्चेत आले. ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एका पथकाने मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकला. या छाप्यात कथित ड्रग्ज जप्त केले आणि आर्यन खानसह काहीना अटक केली. पण या प्रकरणात समीर वानखेडे यांत्या कारवाईवरच आणि एनसीबीने छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांच्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. एनसीबी अधिकारी शाहरुख खानकडून पैसे उकळण्यासााठी हा छापा टाकण्याचे नाटक केले गेले, असे अनेक आरोपही केले गेले.

Sameer Wankhede

Sameer Wankhede

तर दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक यांनीदेखील समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. वानखेडे जन्मतः मुस्लिम आहेत. मात्र नंतर त्यांनी अनुसूचित जाती (SC) कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे दाखवल्याचा आरोप मलिक यांनी केला. यामुळे त्यांच्याभोवतीही चौकशीचा फास आवळला गेला. त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांनाही लक्ष्य केले गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com