नगर : नगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले.
आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील रस्त्यांना मंजुरी देतो; पण त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शरद पवार यांनी आलं पाहिजं. ही गोष्ट मला रोहित पवारांकडून समजताच कार्यक्रमाला येणे मला भाग पडले. गडकरींच्या कार्यक्रमाला जायचे म्हटल्यानंतर शक्यतो दोन-चार दिवसांत काहीतरी बदल बघायला मिळतो. ही स्थिती येथेही दिसेल. असे पवार यांनी सांगितले.
मला आठवतंय गडकरी यांनी या मंत्रालयाची बाबदारी घेण्यापूर्वी ५ हजार किमीचे काम झाले होते. गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे,'' असे पवार यांनी सांगितले.
एक गोष्टी इथे सांगावी लागेल. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्याठिकाणचे रस्ते उत्तम असे पाहायला मिळतात. तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी त्याबद्दल चर्चा केल्यानंतर ते सांगतात की, 'ये गडकरी साहब की कृपा है'. असे पवार यांनी म्हटले.
एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी यांनी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा कोणताही लोकप्रतिनिधी असो, ते येणाऱ्याचा पक्ष कधी पाहत नाहीत, असे सांगत पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.