जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात नेमून दिलेल्या कर्तव्यामध्ये कसुर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे
Notices Serverd on Twenty Five Personnel of Jalgaon Medical College
Notices Serverd on Twenty Five Personnel of Jalgaon Medical College

जळगाव : देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात नेमून दिलेल्या कर्तव्यामध्ये कसुर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलभ रोहण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.  

नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर येण्याचे आदेश

डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आला आहे. अशावेळी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जे कोणी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे. अन्यथा त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. 

''काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर आरोग्य विभागाने तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता महिला बचतगटांनी तयार केलेले मास्क खरेदी करावे. तसेच निवारागृहातील नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची तपासणी संबंधित नोडल अधिकारी यांनी करावी. नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याकरीता जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता घ्यावी," अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com