अमोल कोल्हेंसोबत सेल्फीसाठी वाट्टेल ते!

अमोल कोल्हेंसोबत सेल्फीसाठी वाट्टेल ते!

टाकळी हाजी :शिरुर लोकसभेचे खासदार राजकारणा पेक्षा वक्तृत्व कलेमुळे नागरीकांच्या गळ्यातिल ताईत बनले आहेत. तरूणाई बेरोजगारीच्या समस्या विसरून त्यांच्यासोबत रस्त्यावर सेल्फी काढत असल्याचे चित्र त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात दिसून येत आहे.

कान्हूर मेसाई ( ता. शिरुर) येथे शिरुर लोकसभेचे खासदार डाँ अमोल कोल्हे यांनी नूकतीच भेट दिली. त्यांच्या स्वागता साठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता. फटाक्यांची आतषबाजी व फुलांचा वर्षाव करण्यात आला. कोल्हे आल्यावर त्यांना औक्षण करण्यात आले. यावेळी महिलांना मोठा ञास झाल्याचे दिसून आले.

तरुणाईने सेल्फिसाठी गाडिवर चढून आनंद लूटला. माञ या काळात या भागामध्ये असणाऱ्या समस्या बाबत कोणतीच चर्चा झाली नाहि. तरुणाईचा असणारा बेरोजगारीचा प्रश्न मांडला नाहि. पाणीपुरवठा योजना होण्यासाठी आवाज उठवावा, असेही सूचित करण्यात आले नाही. 

या भागातील जेष्ट वयोवृद्ध मतदाराने मतदान केले असेन ते माञ दूरवर उभे राहून खासदार आले अन गेले असेच अनुभवले. नागरिकांच्या मनात संभाजी महाराजांची प्रतिमा उभी केल्याने मतदारांच्या मनात त्यांना वेगळा दर्जा आहे. माञ या भागातील समस्या सोडविल्यानंतरच राजकीय वर्चस्व मिळेल अशी सध्याची स्थिती आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की शिवस्वराज्य यात्रेला तरूणाईची मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. सत्ताधारी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या कामाचा निषेध करत आहेत. भविष्यात राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी राज्यभर दौरा करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com