भुजबळांच्य़ा येवल्यात 294 कोटींची कर्जमाफी ?

भुजबळांच्य़ा येवल्यात 294 कोटींची कर्जमाफी ?
Published on
Updated on

नाशिक : कर्जमाफीसाठी शेतकरी संपाची ठिणगी पुणतांबा गावापासून पेटली मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी जो वणवा पेटला तो येवल्यातून...आजही आंदोलनातील ४२ शेतकरी तुरुंगात आहे.मात्र त्यांचा हा लढा वाया जाणार नाही कारण शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यात सर्वाधिक लाभ तालुक्याला होणार आहे.
जिल्हा बँकेत तालुक्यातीलच अध्यक्ष व दोन संचालक असल्याने मागील खारीपात विक्रमी कर्जवाटप झाले आहे.यामुळे कर्जमाफीचा आकडा देखील विक्रमी असून पिककर्ज थकीत असल्याने तब्बल २९४ कोटी ५५ लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. शिवाय २४ हजार ६१३ शेतकऱ्यांचा सातबारा उतारा देखील कोरा होणार आहे.  

येवल्यात अल्प पावसामुळे मागील तीनही वर्ष नुकसानीचे राहिले असून जेव्हा शेती पिकली तेव्हा मात्र भाव न मिळाल्याने कर्जाचे आकडे फुगत गेले.म्हणूनच जेव्हा संपाची हाक दिली गेली तेव्हा जिल्ह्यातील आंदोलनाची पहिली बैठक येथे झाली होती.प्रत्यक्षात जेव्हा आंदोलन सुरु झाले तेव्हा तर पहिल्याच दिवशी तालुक्यातील आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर सलग सात दिवस प्रत्येक गाव जिद्दीने  संपात सहभागी झाले होते.सायगाव,धुळगाव सारख्या गावाने तर सातही दिवस आंदोलनाची धूम केली होती.यादरम्यान दोन हजार शेतकऱ्यावर दरोडा व हल्याचा गुन्हा दाखल झाला असून ४२ शेतकरी तुरुंगात आहेत.कर्जमाफीने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळाला असल्याचे तालुका बोलू लागला आहे.


सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याला तत्त्वत: मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.बहुतांश अल्पभूधारकांना एक लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येते.शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकेतील जिल्ह्यातील थकबाकीदार लाखभर शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.


अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांचे “नवं-जुनं’ करून त्यांना चालू बाकीमध्ये आणण्यात आले होते.शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने याचा थकबाकीदारांसह चालू बाकीदारांनाही फायदा होणार आहे.जिल्हा बँकेकडून सरकारने मार्च २०१७ पर्यत आणि ३० जून २०१७ (म्हणजेच आजपर्यत) असलेल्या थकबाकीदारांची माहिती घेतली आहे.ज्या अर्थी व्याजासह थकबाकीदारांची सरकारने हि माहिती घेतली त्या अर्थी सगळ्यांनाच याचा लाभ मिळेल असे दिसते.

येवला माफीत राहणार अव्वल


जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे हे दोघे बँकेत असल्याने मागील खरीपात तालुक्यातील शेतकऱ्यांना विक्रमी कर्ज वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे साहजिकच आता कर्जमाफीचा लाभ देखील विक्रमी प्रमाणात होणार आहे. 
३१ मार्च ३०१७ अखेर २४ हजार ६१३ शेतकर्याकड़े २९४ कोटी ५५ लाख रुपये पिककर्ज बाकी आहे.शासनने सरसकट कर्जमाफी जाहिर केल्याने या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल नंतर आपल्याकडील कर्जफेड करुन एक हजार ३४४ शेतकर्यानी १२ कोटी ६२ लाख रुपये कर्ज घेतले आहे.म्हणजे ही रक्कम देखील आज थाकितच मानली जात आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com