Chandgad Assembly Election 2024 : ‘चंदगड’च्या विकासासाठी मानसिंग खोराटेच योग्य - डॉ. प्रकाश शहापूरकर

‘‘चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटेच योग्य पर्याय असलेले उमेदवार आहेत.
Chandgad Assembly development mansing khorate is right candidate says prakash shahapurkar
Chandgad Assembly development mansing khorate is right candidate says prakash shahapurkar
Published on
Updated on

गडहिंग्लज : ‘‘चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटेच योग्य पर्याय असलेले उमेदवार आहेत. त्यांना मताधिक्य देऊया,’’ असे आवाहन गोड साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केले.

चंदगड मतदार संघातील उमेदवार श्री. खोराटे यांच्या प्रचारासाठी मुत्नाळ येथे शहापूरकर गट, तसेच खोराटे सर्मथकांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘गडहिंग्लजसह चंदगड, आजरा तालुक्यांच्या विकासाला गती देण्यासाठी विकासाची दृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व विधानसभेत गेले पाहिजे.

चाळीस वर्षांतील बॅकलॉग भरून काढून पुढील पन्नास वर्षांचे नियोजन असणारा नेता निवडणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ज्यांनी ‘दौलत’चे शिवधनुष्य पेलले, अशी विकासाची दृष्टी व काम करण्याची क्षमता असलेल्या मानसिंग खोराटे यांना मताधिक्य देऊ या.’

श्री. खोराटे म्हणाले, ‘मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा सारासार विचार करून विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार केली आहे. याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवेन.’

गोड साखर कारखान्याचे अरुण गवळी, सरपंच पूजा कोरे, बसवराज अरबोळे, भरमू जाधव, आनंदराव जाधव, ॲड. संतोष मळवीकर, बी. के. काळापगोळ, मल्लाप्पा कल्याणी, राजेंद्र गवळी, उपसरपंच सूरज गवळी, युवराज नाईक,

अक्षय पाटील, प्रमोगिनी खातेदार, रामगोंडा गोडसे, संजय मिरजे, ओंकार घबाडे, केतन पाटील, उमाकांत मदकरी, अलाप्पा गुंनगुंजी, राजू चव्हाण, अभिजित कुलकर्णी, राजू चव्हाण, भीमराव चौगुले, वीरेंद्र चौगुले, आनंद गुरव, उमेश रामजी, अजित कबुरी, संजय घस्टी, दुंडापा मादकरी, मंजूनाथ बंदी, सुनील नागरे, अजित दावणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com