

जंगमहट्टी : `बाळासाहेबांची शिवसेना फोडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची शकले केली. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार जाहीर करणाऱ्या फडणवीसांनी दुसऱ्या दिवशीच त्यांना सत्तेत घेतले. शहा-फडणवीसांच्या या सरकारने लोकशाहीचा गळा कापला. घोडे बाजार करणाऱ्या या भाजप सरकारला महाराष्ट्राच्या मातीत गाडा’, असा घणाघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी केला.
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘विकासाचा नावाखाली तालुक्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता नाही. ठेकेदारांना लुटले जात आहे. प्रशासन मोकाट सुटले आहे. शाळांच्या इमारती ढासळत आहेत. आरोग्याच्या सुविधा नाहीत. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील आमदारांना आता पेन्शनवर पाठविण्याची गरज आहे.’
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुपंत गावडे म्हणाले, ‘नंदाताईंचे चंदगड तालुक्यावर मोठे उपकार आहेत. त्यांनी एव्हीएच प्रकल्प घालविला. महिला असताना सुद्धा त्या एव्हीएचच्या लढ्यात सेनापती म्हणून लढल्या. तुरुंगात गेल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रदूषण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आंदोलनात त्यांच्यावर मारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यात त्या घुसमटल्या पण डगमगल्या नाहीत.’’
विक्रम चव्हाण म्हणाले, ‘‘माझे आजोबा दिवंगत व्ही. के. चव्हाण-पाटील यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा हा गाव आहे. काँग्रेसची विचारधारा येथील मातीत रुजली आहे. कोणी कितीही आमिषे दाखविली तरी येथील लोक नंदाताईंच्याच पाठीशी राहणार, असा विश्वास देतो.’ यावेळी प्रा. एम. आर. पाटील यांनी स्वागत केले. रामराजे कुपेकर, तानाजी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन गावडे, दत्तू गावडे, दीपक गावडे, सुभाष पार्शी, पांडू धामणेकर, रवळू गावडे, संदीप पाटील, अजय साखळे, एन. जी. गावडे, संजय तांबे, आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.