Chandgad Assembly Election 2024 : महायुती सरकारच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास - सुस्मिता पाटील

Chandgad Assembly Election 2024 : महायुती सरकारच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास - सुस्मिता पाटील

‘चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार राजेश पाटील यांनीच केला आहे.
Published on

चंदगड : ‘चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार राजेश पाटील यांनीच केला आहे. विरोधक नको ते आरोप करत असले तरी महायुतीने दिलेल्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीच आमदार पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करतील,’ असा विश्वास सुस्मिता पाटील यांनी व्यक्त केला.

महायुती राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ कोवाड (ता. चंदगड) परिसरातील निट्टूर येथील प्रचार फेरीवेळी त्या बोलत होत्या. सुस्मिता पाटील म्हणाल्या, ‘सर्वसामान्य मायमाऊलींना सरकारने मदतीचा हात दिला आहे.

आमदार राजेश पाटील यांनी गेल्या तीस वर्षांपासून मतदारसंघातील समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. महापूर असो किंवा कोरोनाचे संकट असो सर्व परिस्थितीमध्ये अहोरात्र काम केले आहे आणि यापुढेही ते करत राहणार आहेत. येथील जनतेशी त्यांची जीवाभावाची नाळ जोडली गेली आहे आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच त्यांचा विजय निश्चित आहे.’

सरपंच गुलाब पाटील म्हणाले, ‘आमदार राजेश पाटील यांनी कोवाड परिसरातील प्रत्येक गावांना कोट्यवधींचा निधी दिला आहे. परिसरातील सर्व ओढ्यांवर मोठे पूल बांधले आहेत. विरोधक मतदारसंघात केवळ पाच वर्षांतून एकदा येतात.

एसी रूममध्ये बसतात. अशांना येथील विकासकामे कशी दिसणार? विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपण काम करणाऱ्या माणसाला भरघोस मतांनी निवडून देऊया. राजेश पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवूया.’

‘परिसरातीत सर्व गावे राजेश पाटील यांच्यामागे उभे राहतील आणि त्यांना आमदारच नाही तर मंत्री करतील आणि मतदारसंघाचा आणखी कायापालट करण्याची संधी देतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती ज्योती पवार, माजी संचालक राजू जाधव, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा संगीता पाटील, मधुकर नाईक, बहिर्जी पाटील, भारत पाटील, मारुती साळुंखे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com