खानापूरला राष्टवादीतर्फे विधानसभा लढविणार:रावसाहेब पाटील   

शिवसेनेचे अनिल बाबर हे खानापूरचे विद्यमान आमदार आहेत . त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत ७२ हजार ८४९ मते पडली होती . काँग्रेसचे सदाशिव पाटील यांना ५३ हजार ५२ मते मिळाली होती . तेंव्हा भाजपतर्फे लढताना गोपीचंद पडळकर यांना ४४ हजार ४१९ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे आबासाहेब उर्फ अमरसिंग देशमुख यांना ३९ हजार ७२५ मते मिळाली होती .
Khanapur-NCP
Khanapur-NCP

आटपाडी : " खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे. त्यासाठी पक्षातील नेत्यांना शिष्टमंडळ घेऊन भेटणार असून उमेदवारी मागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून उतरणार आहे," अशी  घोषणा पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष श्री. पाटील यांनी निवासस्थानी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संभाजी पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष सादीक खाटीक, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुरज पाटील उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले," गेल्यावेळी पक्षाने योग्य पद्धतीने उमेदवारीची प्रक्रिया योग्य राबवली नव्हती. माझा व्यक्तिगत कोणालाही विरोध नव्हता. मात्र उमेदवारीची प्रक्रिया कार्यकर्त्यावर अन्याय करणारी होती. तो राग व्यक्त करण्यासाठी आणि तालुक्यातून तरुण चेहरा विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यामुळे मी भाजपच्या व्यासपीठावर गेलो. भाजपची विचारसरणी मला कधीच मान्य नव्हती. त्यानंतर पुन्हा पक्षाचे काम सुरू केले.  विधानसभेला दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच मतदार संघ राहण्यासाठी आग्रही आहोत."

"  माझ्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्यासह प्रमुख मंडळींचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहे. अनेक चळवळी आणि आंदोलने केलीत. माझी लोकांशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीतून मी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य इच्छुकांना माझा विरोध नाही,"  उमेदवारीसाठी शिष्टमंडळ वरिष्ठ नेते मंडळींना भेटणार असल्याची घोषणा श्री. पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी पक्षाकडे रावसाहेब पाटील यांच्या उमेदवारीसाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहोत आणि उमेदवारीसाठी आग्रही आहोत. सर्वजण त्यांचे विधानसभेला नेटाने काम करून विजय खेचून आणणार. त्यांच्या सोबत असल्याचा जाहीर केले. 

शिवसेनेचे अनिल बाबर हे खानापूरचे विद्यमान आमदार आहेत . त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत ७२ हजार ८४९ मते पडली होती . काँग्रेसचे सदाशिव पाटील  यांना ५३ हजार ५२ मते मिळाली होती . तेंव्हा  भाजपतर्फे लढताना गोपीचंद पडळकर यांना ४४ हजार ४१९ मते मिळाली होती  तर राष्ट्रवादीचे आबासाहेब उर्फ अमरसिंग देशमुख यांना ३९ हजार ७२५ मते मिळाली होती . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com