Ichalkaranji Assembly Election 2024 : इचलकरंजीच्या विकासाची संधी द्या - राहुल आवाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील २०४७ चा विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसारच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरुणांना संधी दिली आहे.
Ichalkaranji Assembly Election 2024 rahul awade over development of ichalkaranji
Ichalkaranji Assembly Election 2024 rahul awade over development of ichalkaranji
Published on
Updated on

इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील २०४७ चा विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसारच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरुणांना संधी दिली आहे.

त्याच अनुषंगाने देशात आणि राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि कल्याणकारी योजनांच्या बळावर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे, असा दावा भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी केला. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वांनी मला मतरूपी आशीर्वादाचे पाठबळ देऊन लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ कुरुहीन शेट्टी भवन येथे संवाद मेळावा झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर,

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे यांनी मार्गदर्शन केले. जगातील सर्वांत तरुण देश म्हणून विकसित भारत निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी तरुण, तडफदार उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांना विधानसभेत लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवूया, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप शहर अध्यक्ष अमृत भोसले, रमेश कबाडे, मोहन मालवणकर, श्‍वेता मालवणकर, महेश सातपुते, धोंडिराम जावळे, महिला अध्यक्षा अश्‍विनी कुबडगे, ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, सुहास कांबळे, प्रशांत नवनाळे, अनिस म्हालदार, संतोष कांदेकर, अतुल सुस्वरे, प्रमोद पोवार, चंद्रकांत कोष्टी, कुमार चव्हाण, हेमंत वसुरे, सोनाली आरेकर, अर्चना कुडचे, मनोज ठोके, शीतल बिडकर, दीपक वीर, सुरेश पोवार, विलास कोरवी, अनंत डोंगरकर, राजेश सातपुते, बाळासाहेब ओझा, उदय धातुंडे, मनोहर ढवळे, नरसिंह पारिक, वृषभ जैन, प्रवीण केसरे, अतुल वडिंगे, तानाजी साठे, शिवाजी जाधव, पप्पू डाके आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com