कर्नाटककडून कुरापती काढण्याचं काम सुरुच; सीमावादानंतर आता अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट!

Almatti Dam Karnataka : कर्नाटकच्य़ा निर्णयामुळे सांगली,कोल्हापूरमध्ये अस्वस्थता
Basavraj Bommai , Almatti dam
Basavraj Bommai , Almatti dam Sarkarnama

संभाजी थोरात

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद चांगलाच पेटला होता. यामुळे राजकीय वातावरण देखील तापलं होतं. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सीमावाद निवळला आहे. परंतू, कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या कुरापती काढण्याचं काम सुरुच असल्याचं समोर येत आहे. आता कर्नाटककडून अलमट्टी(Almatti Dam) धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटकच्य़ा या निर्णयामुळे सांगली,कोल्हापूरमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कृष्णा नदीवर असलेल्या अलमट्टी धरणाची उंची सध्या 519 मीटर आहे. या धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येतो हे अनेक अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. या महापुरामुळे या दोन जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान होते. त्याचबरोबर जनजीवन ही विस्कळीत होते. अनेकदा या महापुरामुळे लोकांना जीवही गमवावा लागतो.

Basavraj Bommai , Almatti dam
Shrikant Shinde : सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो; खासदार शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

अलमट्टी धरणाच्या पाणी साठवण्यावरून वाद आहे. कृष्णा पाणी वाटप लवाद-2 ने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार कर्नाटकच्या कृष्णा भाग्य जलनिगमने उंची वाढवण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्लागारासाठी निविदा काढली आहे. अलमट्टीची उंची वाढवून आता 524 करण्यात येणार आहे. 519 मीटर उंची असताना इतका हाहा:कार होतोय तर ही उंची 5 मीटरने वाढवल्यामुळे आता आणखी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही कर्नाटक(Karnataka) ने आडमुठी भूमिका घेऊन महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांना अडचणीत आणलं आहे.

Basavraj Bommai , Almatti dam
Uddhav Thackeray News : शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर आमदार प्रकाश फातर्फेकरांनी स्पष्टच सांगितले

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा आडमूठी निर्णय घेतले आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगलीत अस्वस्थता आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची देखील शक्यता आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रकरणांमध्ये आता केंद्र सरकारने लक्ष घालून ही उंची वाढवू देऊ नये अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com