Karvir Assembly constituency : करवीर मतदारसंघाच्या उन्नतीसाठी चंद्रदीपना मताधिक्य द्या; जालिंदर पाटील

महायुती सरकारने सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून कल्याणकारी योजनांद्वारे त्यांना थेट लाभ दिला आहे.
Karvir Assembly constituency
Karvir Assembly constituency
Published on
Updated on

कसबा बीड : महायुती सरकारने सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून कल्याणकारी योजनांद्वारे त्यांना थेट लाभ दिला आहे. महाविकास आघाडीची तीन राज्यांत सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, त्यापैकी एकही वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे करवीर मतदारसंघाच्या उन्नतीसाठी चंद्रदीप नरके यांना मताधिक्य द्या, असे आवाहन जालिंदर पाटील यांनी केले.

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कसबा बीड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नरके यांनी करवीर तालुक्यातील घुंगूरवाडी, घानवडे, मांजरवाडी, चव्हाणवाडी, आरळे, गर्जन, चाफोडी, मांडरे, सावर्डे दु., सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, सावरवाडी, शिरोली दुमाला, कसबा बीड, महे, कोगे या गावांत प्रचार दौरा केला.

माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची तातडीने अंमलबजावणी सुरू केल्यामुळे महिला, युवक व शेतकऱ्याची उन्नती साधली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरली आहे.

काँग्रेसने सत्तेच्या काळात साखर कारखान्याच्या प्राप्तिकरचा प्रश्‍न सोडवला नाही. मोदी सरकारने राज्यातील सर्वच कारखान्याचा प्राप्तिकर माफ केला. त्याचा फायदा शेतकऱ्यांनादेखील झाला. साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्याची मागणी मी केली होती. ती सरकारने मान्य केली. कारखाना अडचणीत असतानाही दर दिला. विकासासाठी बळ द्या.’’

प्रताप पाटील, जनार्दन पाटील, हंबीरराव पाटील, मधुकर जांभळे, मुकुंद पाटील, शिवाजी देसाई, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक उत्तम वरुटे, किशोर पाटील, दादासो लाड, अनिल पाटील, अमित वरुटे, शैलेश वरुटे, पंडित वरुटे यांनीही भाषणे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com